IPL 2024, MI vs DC : रोमारिओ शेफर्डने शेवटच्या षटकात ३२ धावा कशा काढल्या?

IPL 2024, MI vs DC : शेफर्डच्या १० चेंडूंत ३९ धावांमुळे मुंबई इंडियन्सनी २०० चा टप्पा ओलांडला 

221
IPL 2024, MI vs DC : रोमारिओ शेफर्डने शेवटच्या षटकात ३२ धावा कशा काढल्या?
IPL 2024, MI vs DC : रोमारिओ शेफर्डने शेवटच्या षटकात ३२ धावा कशा काढल्या?
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमध्ये सामन्याचा रंग बदलण्यासाठी एक चेंडू पुरेसा असतो असं म्हणतात. म्हणजे एखादा बळी, षटकार किंवा आणखी कुठलीही घटना सामन्याचा नूर पालटू शकते. क्रिकेटमध्ये तसं झालेलंही आहे. अशावेळी फलंदाजाला एका ऐवजी सहा चेंडू मिळाले तर? मुंबई इंडियन्सच्या रोमारिओ शेफर्डला (Romario Shepherd) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शेवटचं षटक खेळण्याची संधी मिळाली. त्याने चक्क विक्रमी ३२ धावा वसूल केल्या. मुंबई इंडियन्सची धावसंख्या त्यामुळे थेट ५ बाद २३४ वर पोहोचली. (IPL 2024, MI vs DC)

(हेही वाचा- Amol Kirtikar ED Summons: अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पुन्हा समन्स)

शेफर्डने १० चेंडूंत ३९ धावा करताना ४ षटकार आणि ३ चौकार ठोकले. त्यानंतर निर्धारित २० षटकांत दिल्लीला ८ बाद २०५ धावांवर रोखत मुंबईने या हंगामातील आपला पहिला वहिला विजय नोंदवला. एनरिच नोर्किए या कसलेल्या आणि तोपर्यंत सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या गोलंदाजालाच शेफर्डने लक्ष्य केलं. (IPL 2024, MI vs DC)

या षटकात शेफर्डच्या धावा होत्या ४, ६, ६, ६, ४ आणि ६. शेफर्डच्या या धडाक्यामुळे आयपीएलच्या  इतिहासातील हे सहावी सगळ्यात महागडं षटक ठरलं आहे. आधी हे षटक पाहूया, (IPL 2024, MI vs DC)

(हेही वाचा- Madhavi Lata: ओवेसींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांना Y+ सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय)

एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम हा ख्रिस गेल (Chris Gayle) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्या नावावर आहे. दोघांनी ६ चेंडूंत ३७ धावा वसूल केल्या होत्या. गेलने २०११ मध्ये तर जाडेजाने २०२१ मध्ये हा पराक्रम केला होता. आयपीएलमधील महागडी षटकं पाहूया,  (IPL 2024, MI vs DC)

(हेही वाचा- Multan Cricket Stadium : वीरेंद्र सहवागच्या ३०९ धावांमुळे गाजलेलं मुलतान क्रिकेट स्टेडिअम कसं आहे?)

धावा

फलंदाज

गोलंदाज

स्थळ

३७

ख्रिस गेल (बंगळुरू)

प्रशांत परमेश्वरन (कोची टस्कर्स)

बेंगळुरू (२०११)

३७

रवींद्र जाडेजा (चेन्नई)

हर्षल पटेल (बंगळुरू)

मुंबई (२०२१)

३५

पॅट कमिन्स (कोलकाता)

डॅनिएल सम्स (मुंबई)

पुणे (२०२२)

३३

सुरेश रैना (चेन्नई)

परविंदर अवाना (पंजाब)

मुंबई (२०१४)

३३

मनोज तिवारी/ख्रिस गेल (कोलकाता)

रवी बोपारा (पंजाब)

कोलकाता (२०१०)

३२

रोमारिओ शेफर्ड (मुंबई)

एनरिच नोर्किए (दिल्ली)

मुंबई (२०२४)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.