IPL 2024 : हा आहे पहिल्या आठवड्यातील आयपीएल XI संघ

संजू सैमसन, विराट कोहली, आंद्रे रसेल यांच्या कामगिरीने पहिला आठवडा गाजवला आहे

100
IPL Mega Auction : संपूर्ण लिलावापूर्वी संघांना ४ ऐवजी ८ खेळाडू राखून ठेवता येणार?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL 2024) सतराव्या हंगामाचा पहिला आठवडा संपला आहे. आणि यजमान संघाने मिळवलेले सलग ९ विजय हे जसं वैशिष्ट्य ठरलं तसंच विराट कोहलीचा फॉर्म, संजू सैमसन, रियान पराग आणि अलीकडे सुनील नरेनची खेळी यांनी हा आठवडा गाजवला आहे. जसप्रीत बुमरा आणि मुफ्तिफिजुर रेहमान आपल्या गोलंदाजीची छापही पाडत आहेत. आतापर्यंतच्या अकरा सामन्यांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही तयार केला आहे पहिल्या आठवड्याचा आयपीएल XI संघ. तो आहे पुढील प्रमाणे,

रचिल रवींद्र (चेन्नई सुपरकिंग्ज) – भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने आपला ठसा उमटवला होता. आणि त्यानंतरच चेन्नई संघाने त्याला लिलावात १.४ कोटी रुपयाला उचललं. आता हे पैसे फुकट नव्हते, हेच त्याने कामगिरीने दाखवून दिलं आहे. डावखुरा आक्रमक सलामीवीर म्हणून त्याने जागा पक्की केली आहे. २ सामन्यांत त्याने केल्या आहेत ८३ धावा. पण, २४७ च्या स्ट्राईकरेटने.

संजू सैमसन (राजस्थान रॉयल्स) – संजू सॅमसनला खरंतर याक्षणी भारतीय संघात खेळण्याची आस आहे. पण, तिथे महत्त्वाच्या क्षणी त्याला संधी मिळत नाही. आयपीएलमध्ये (IPL 2024) मात्र त्याने राजस्थान रॉयल्स संघाची अमूल्य सेवा केली आहे. आताही राजस्थानला कप्तान म्हणून त्याने पहिले दोन्ही सामने जिंकून दिले आहेत. आणि स्वत: शेवटच्या सामन्यात ८३ धावा केल्या आहेत. एकूण २ सामन्यांत त्याच्या आहेत ९४ धावा. आणि स्ट्राईकरेट १७१

(हेही वाचा – Hardik Pandya Frustrated : हार्दिक पांड्याचा राग जेव्हा मैदानातच निघतो…)

रियान पराग (राजस्थान रॉयल्स) – रियान परागने एका सामन्यात आपण या हंगामासाठी तयार आहोत, असं दाखवून दिलंय. आसामसाठी चांगल्या धावा करून तो आयपीएलच्या संघात परतलाय. आणि इथंही दोन सामन्यांत १२४ धावा करून मैदान गाजवताना दिसतोय. ८४ ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आणि त्याचा स्ट्राईकरेट आहे १७१.

हेनरिक क्लासेन (सनरायझर्स हैद्राबाद) – ३२ वर्षीय क्लासेनने मुंबई विरुद्धच्या सामन्यात आपला क्लास खऱ्या अर्थाने दाखवून दिला. कोलकाता विरुद्ध त्याने २९ चेंडूंत ६३ धावांची खेळी खेळली होतीच. त्यानंतर मुंबई विरुद्ध कमाल करताना त्याने ४० चेंडूंत ८० धावा केल्या. आणि संघाला २७७ धावांचा डोंगर उभारायला मदत केली. ऑरेंज कॅप काही काळ त्याच्याकडेच होती. त्याने २ सामन्यांत १४३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट आहे २२६ धावांचा.

आंद्रे रसेल (कोलकाता नाईटरायडर्स) – वेस्ट इंडिजचा ३५ वर्षीय आंद्रे रसेल आयपीएलमध्ये कोलकाता संघाची धुरा मागची काही वर्षं वाहतोय. या वयातही आयपीएलमधील (IPL 2024) तो एक सगळ्यात चांगला अष्टपैलू खेळाडू ठरावा. सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धची त्याची मोलाची खेळी आणि मोक्याच्या क्षणी घेतलेले बळी यामुळे तो अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळवतोच. त्याच्या नावावर २ सामन्यांत आहेत ६४ धावा. आणि ४ बळी. धावांमध्ये त्याचा स्ट्राईकरेट आहे २५६ धावांचा.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर होणार; कोणाला मिळणार संधी ?)

मनप्रीत ब्रार (पंजाब किंग्ज इलेव्हन) – पंजाबचा हा डावखुरा फिरकीपटू पंजाब संघासाठी मुख्य शस्त्र ठरतोय. २६ वर्षीय मनप्रीतने २ सामन्यांतून ३ बळी मिळवले आहेत. पण, यातही त्याची षटकामागची सरासरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याने फक्त ३.८५ धावा षटकामागे दिल्या आहेत. १३ धावांत २ बळी ही आतापर्यंतची त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

मुस्तफिझुर रेहमान (चेन्नई सुपरकिंग्ज) – मुस्तफिझुरकडेच सध्या पर्पल कॅप आहे. कारण, चेन्नईच्या चेपक स्टेडिअमवर तो कमालीचा भेदक ठरलाय. चेन्नई फ्रँचाईजीने त्याला संघात घेतल्यानंतर तो आयपीएलमध्ये (IPL 2024) चांगलाच स्थिरावतोय. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यांत बंगळुरू विरुद्ध त्याने २९ धावांत ४ बळी घेतले होते. आणि पाठोपाठ त्याने २ बळी घेतले आहेत. त्यामुळे २ सामन्यांत ६ बळी आणि षटकामागे ७ ची धावगती यामुळे तो कुठल्याही संघाला हवासा वाटणाराच आहे.

विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – विराट कोहली कुठल्याही संघाला कुठल्याही क्षणी हवाच असा खेळाडू आहे. पण, २ महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यावर आता तो वेगळ्याच तडफेनं खेळताना दिसतोय. सध्या ३ सामने खेळल्यानंतर त्याच्याचकडे ऑरेंज कॅप आहे. पहिल्या सामन्यांत २० चेंडूंत २१, दुसऱ्या सामन्यात ३९ चेंडूंत ७७ आणि त्यानंतर ५९ चेंडूत ८३ असा त्याचा चढता क्रम आहे. १८१ धावा करताना त्याने १४१ धावांचा स्ट्राईकरेट राखला आहे.

(हेही वाचा – IPL 2024, RCB vs KKR : यजमान बंगळुरूवर कोलकाताचा दिमाखदार विजय )

इम्पॅक्ट खेळाडू शिवम दुबे (चेन्नई सुपरकिंग्ज) – आयपीएल हा षटकारांचा खेळ असेल तर शिवम दुबेता संघात समावेश अनिवार्य आहे. आतापर्यत चेन्नई संघासाठी त्याने ५७ षटकार खेचले आहेत. आणि यातले ३५ एकट्या २०२३ च्या हंगामातील आहेत. त्यामुळे इम्पॅक्ट खेळाडू म्हणून त्याचा नक्कीच विचार होऊ शकतो.

यझुवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) – यजुवेंद्र चहल भारतीय संघात सध्या नाहीए. पण, आयपीएलमध्ये (IPL 2024) बळी मिळवण्यात तो वाकबगार आहे. १९ धावांत २ बळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आणि २ सामन्यांत त्याने ३ बळी मिळवलेत. फलंदाजांना चकवण्यात तो माहीर आहे.

जसप्रीत बुमरा (मुंबई इंडियन्स) – जसप्रीतला मुंबईकडून पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी दिली गेलेली नाही. पण, जी संधी मिळाली, त्यात त्याने बळी मिळवण्यात कसूर केलेली नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने १४ धावांत ३ बळी घेतले होते. आणि त्याच्या अचूकतेमुळे तो कुठल्याही संघात स्थान मिळवण्यासाठी योग्य आहे

नांद्रे बर्गर (राजस्थान रॉयल्स) – वेग आणि चेंडूला उसळी देण्याची त्याची कला ही वादातीत आहे. २८ वर्षांचा हा आफ्रिकन गोलंदाज त्यामुळेच कुठल्याही संघासाठी भेदक अस्त्र मानला जातो. यंदा त्याने २ सामन्यांत ३ बळी मिळवले आहेत.

राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा या संघाचे प्रशिक्षक असतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.