IPL 2024 : पहिल्या २ आठवड्याचं वेळापत्रक जाहीर, बंगळुरू वि चेन्नई सामन्याने होणार सुरुवात 

IPL 2024 : अपेक्षेप्रमाणे २२ मार्चपासून आयपीएलचा पहिला टप्पा सुरू होणार आहे

123
IPL 2024 : पहिल्या २ आठवड्याचं वेळापत्रक जाहीर, बंगळुरू वि चेन्नई सामन्याने होणार सुरुवात 
IPL 2024 : पहिल्या २ आठवड्याचं वेळापत्रक जाहीर, बंगळुरू वि चेन्नई सामन्याने होणार सुरुवात 

ऋजुता लुकतुके

आयपीएलचा सतरावा हंगाम अटकळ होती (IPL 2024) त्याप्रमाणे २२ मार्चपासून सुरू होणार आहे. आयोजकांनी सध्या पहिल्या २ आठवड्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. (IPL 2024) आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या संघांदरम्यान रंगणार आहे. (IPL 2024) गेल्यवर्षीपर्यंत आधीच्या हंगामातील विजेता आणि उपविजेता संघ पहिला सामना खेळत असत. पण, ही परंपरा यंदा मोडीत निघाली आहे. हा सामना चेन्नईला चिदंबरम स्टेडिअमवर रंगणार आहे.

(हेही वाचा- Mumbai-Pune Expressway ब्लॉक मुंबईकडे जाणारी वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद )

अजून देशातील सार्वत्रिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर व्हायचं आहे. त्यामुळे आयपीएलला (IPL 2024) अख्खं वेळापत्रक बनवता येणार नाहीए. कारण, मतदानाचे टप्पे आणि निकालाचा दिवस पाहून मग आयपीएल (IPL 2024) वेळापत्रकाला अंतिम स्वरुप द्यावं लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने सध्या पहिल्या १७ दिवसांतले २१ सामने जाहीर केले आहेत.

पहिला टप्पा एकूण १० शहरांमध्ये पार पडणार आहे. आणि प्रत्येक संघ किमान ३ आणि कमाल ५ सामने या कालावधीत खेळणार आहे. यात एक शनिवार,रविवार असून त्या दोन्ही दिवशी दोन सामने खेळवण्यात येतील. (IPL 2024) शनिवारचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Punjab Kings vs Delhi Capitals) आणि दुसरा सामना कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (Kolkata vs Sunrisers Hyderabad) असा होणार आहे. तर रविवारी पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) आणि दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Supergiants) असा रंगणार आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- Patitapavan Mandir : पहिले राष्ट्रमंदिर : पतीतपावन मंदिराची शतकाकडे वाटचाल )

आयपीएलचे (IPL 2024) साखळी सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जातात. म्हणजे प्रत्येक संघ उर्वरित ९ संघांशी प्रत्येकी एकेक सामना खेळतो. यातील एक सामना घरच्या मैदानावर तर दुसरा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर. त्यामुळे एका हंगामात बाद फेरीचे सामने धरुन एकूण ७३ सामने व्हायचे आहेत. त्यातील २१ सामन्याचं वेळापत्रक सध्या जाहीर झालं आहे. (IPL 2024)

दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदा सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी विशाखापट्टणम या होम ग्राऊंडची निवड केली आहे. त्यामुळे संघाचे पहिले दोन सामने तिथे होणार आहेत. (IPL 2024)

‘सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकाचं भान ठेवून बीसीसीआय (bcci) आणि आयपीएल (IPL 2024) प्रशासन केंद्रसरकार, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याशी सहकार्य करून उर्वरित वेळापत्रक ठरवेल. आणि स्पर्धा भारतातच पूर्णत्वास नेईल,’ असं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (IPL 2024)

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.