Mumbai-Pune Expressway ब्लॉक मुंबईकडे जाणारी वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून ग्रँटी बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या मार्गावरून प्रवास करताना या वेळेत प्रवासी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आले आहे.

174
Mumbai-Pune Expressway ब्लॉक मुंबईकडे जाणारी वाहतूक 'या' वेळेत राहणार बंद

पुन्हा एकदा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) दोन तासांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँटी बसवण्यासाठी ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत km ३९/९०० या ठिकाणी ग्रँटी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती रस्ते प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Slum : मुंबईतील झोपडपट्टीत  कचऱ्यासाठी धावणार रिक्षा)

ग्रँटी बसवताना (Mumbai-Pune Expressway) सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच या मार्गावर अवजड वाहने उर्से टोलनाका येथे तसेच शोल्डर लेनवर थांबविण्यात येणार आहेत.

पर्यायी मार्ग

या मार्गावरून फक्त (Mumbai-Pune Expressway) कार साठी km ५५ लोणावळा एक्झीट येथून जुना पुणे मुंबई महामार्ग – अंडा पॉईंट – मॅजिक पॉईंट- शींग्रोबा घाटातून – इंदिरा चौक खोपोली मार्गे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून ग्रँटी बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या मार्गावरून प्रवास करताना या वेळेत प्रवासी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Narayan Rane यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट)

दुपारी १२ ते २ या वेळेत प्रवास करणे टाळावे –

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. अनेकजण पुण्यातून मुंबईत देखील नोकरीसाठी येत असतात. त्यामुळे उद्या या मार्गावरून प्रवास करणार असाल तर दुपारी १२ ते २ या वेळेत प्रवास करणे टाळावे अन्यथा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन रस्ते प्रशासनाकडून व वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई – पुणे हा दोन्ही मेट्रो सिटींना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर १२ ते २ या वेळेत ग्रँटी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन तासांचा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी. (Mumbai-Pune Expressway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.