IPL 2024, CSK vs RCB : चेन्नई विरुद्ध बंगळुरूचा मुकाबला हा धोणी वि. विराट असा मुकाबला 

IPL 2024, CSK vs RCB : नवीन हंगामाची सुरुवातच महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्वाने होणार आहे 

145
 IPL 2024, CSK vs RCB : चेन्नई विरुद्ध बंगळुरूचा मुकाबला हा धोणी वि. विराट असा मुकाबला 
 IPL 2024, CSK vs RCB : चेन्नई विरुद्ध बंगळुरूचा मुकाबला हा धोणी वि. विराट असा मुकाबला 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये दरवर्षी गतविजेता संघ उपविजेत्या संघाशी भिडतो. आणि त्या सामन्याने हंगामाला सुरुवात होते. पण, हा प्रघात काहीशा कारणांनी यावेळी मोडतोय. यंदा गतविजेता चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK) संघ उपान्त्य फेरीतही न पोहोचलेल्या रॉयल चॅलेंजर्स (RCB) संघाशी दोन हात करतोय. चेन्नई या सामन्याचे यजमान असतील. पण, सामन्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोणी (MS Dhoni) विरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) असा मुकाबला बघता येणार आहेत. (IPL 2024,  IPL 2024, CSK vs RCB)

(हेही वाचा- BMC : महापालिकेला ‘या’ निर्णयामुळे MMRDA ला द्यावा लागला निधी)

दोन्ही आपापल्या संघांचे कर्णधार नाहीएत. विराटने दोन वर्षांपूर्वीच कप्तानी सोडलीय. तर धोणीने हा निर्णय स्पर्धेला एक दिवस उरलेला असताना तडकाफडकी जाहीर केला. (IPL 2024, CSK vs RCB)

विराट कोहली (Virat Kohli) दोन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. या कालावधीत राष्ट्रीय टी-२० संघात बीसीसीआयमधील काहींना विराट नकोय, अशा बातम्याही पसरल्या. आणि त्या पार्शभूमीवर विराट टी-२० क्रिकेटने मैदानावर पुनरागमन करतोय. शिवाय जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणूनही त्याच्याकडे हे दोन महिनेच बाकी आहेत. तर दुसरीकडे, महेंद्रसिंग धोणीने (MS Dhoni) अचानक संघाचं नेतृत्व सोडलं. पण, तरीही संघातील तो सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे जशी चर्चा आहे, तशीच धोणी आपली शेवटची आयपीएल खेळतोय का, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असेल. म्हणून म्हटलं, पहिला सामना हा विराट विरुद्ध धोणी असाच असेल. (IPL 2024, CSK vs RCB)

ट्विटरवरील हे पोस्टरही सांगतंय की, सामन्याचं प्रक्षेपण करणारी वाहिनी या सामन्याकडे धोणी विरुद्ध विराट असंच बघतेय. अर्थात, संगातील इतर दहा खेळाडूही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. बंगळुरूचा कर्णधार फाफ दू प्लेसिस खेळाडूंना एकत्र घेऊन खेळाडूंची एकत्र मोट बांधणारा कर्णधार म्हणून नावारुपाला आला आहे. संघात विराट, कॅमेरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल हे खंदे खेळाडू असताना त्याला फलंदाजीची चिंता करण्याची गरज नाहीए. तर गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि कर्ण शर्मा सज्ज आहेत. (IPL 2024, CSK vs RCB)

(हेही वाचा- Loksabha Election 2024 : उमेदवाराला ताफ्यात किती वाहने वापरता येतात ?)

फक्त त्याच्यासाठी अडचणीची गोष्ट एकच आहे. आतापर्यंत तीनवेळा उपविजेता ठरलेला बंगळुरूचा संघ अजूनपर्यंत आयपीएलमध्ये बाजी मारू शकलेला नाही. आणि यातील दोन वेळा त्यांचा घोडा चेन्नईनेच अडवला होता. त्यामुळे फाफच्या संघाकडून यावेळी चाहत्यांना विजेतेपदापेक्षा खाली काहीच नको आहे. (IPL 2024, CSK vs RCB)

(हेही वाचा- Cyber Crime : राजकीय नेत्याचे फोटो वापरून पैशांची मागणी; सायबर गुन्हेगारांची नवीन क्लृप्ती)

दुसरीकडे, चेन्नईचा (CSK) संघ ही जमून आलेली भट्टी आहे. ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad), रवींद्र जाडेजा आणि उगवता खेळाडू शिवम दुबे संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची क्षमता ठेवतात. तर दीपक चहर, शार्दूल ठाकूर हे दोघेही फॉर्मात असलेले गोलंदाज संघाकडे आहेत. आता पहिल्या सामन्यात नेमके कुठले खेळाडू चमक दाखवतात हे सलामीच्या सामन्यातच पहावं लागेल. (IPL 2024, CSK vs RCB)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.