Raj Thackeray : मनसेच्या युतीतील सहभागाविषयी लवकरच निर्णय होणार; दीड तासाच्या चर्चेत काय ठरले ?

Raj Thackeray : २२ मार्च रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वांद्रे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये या तीन नेत्यांची दीड तास चर्चा झाली.

134
Raj Thackeray : मनसेच्या युतीतील सहभागाविषयी लवकरच निर्णय होणार; दीड तासाच्या चर्चेत काय ठरले ?
Raj Thackeray : मनसेच्या युतीतील सहभागाविषयी लवकरच निर्णय होणार; दीड तासाच्या चर्चेत काय ठरले ?

राज ठाकरे यांची मनसे (MNS) महायुतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे. त्यासाठी गेले काही दिवस दिल्ली आणि महाराष्ट्रात वाटाघाटी चालू आहेत. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुवार, २२ मार्च रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महायुतीतील सहभागाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. (Loksabha Election 2024)

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी जेव्हा तोंड उघडतील, तेव्हा काँग्रेसचा शेअर बाजार कोसळेल; खाते गोठवण्यावरून भाजपाचा जोरदार पलटवार )

तीन नेत्यांची दीड तास चर्चा

वांद्रे येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये या तीन नेत्यांची दीड तास चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज यांच्याशी चर्चा सुरू असून योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना ‘अशा भेटी होतच असतात. तुम्ही याविषयी फार खोलात जाऊ नका’, असे सांगून अधिक भाष्य करण्याचे टाळले.

बुधवारी मध्यरात्रीही भेट

‘आम्ही एकाच बैठकीत ८० टक्के जागांबाबत निर्णय केला आहे. दुसऱ्या बैठकीत २० टक्के जागांबाबत निर्णय करू’, असेही फडणवीस म्हणाले. राज आणि फडणवीस यांची बुधवारी मध्यरात्रीही भेट झाल्याची चर्चा आहे. दादर येथे या दोन नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याचे समजते.

शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कोट्यातील जागा जाणार ?

मनसेकडून महायुतीमध्ये तीन जागा मिळण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यामध्ये दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश असल्याचे कळते. दक्षिण मुंबईतील जागा आणि एक राज्यसभा या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. या जागांसाठी महायुतीतील कोणत्या पक्षाने जागा सोडायची यावर तिघांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कोट्यातील जागा दिली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.