Indo-Pak T20 World Cup Tie : टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामना आणि न्यूयॉर्कमधील स्टेडिअम यांची इतकी चर्चा का होतेय?

न्यूयॉर्कमध्ये ज्या ठिकाणी टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामना होणार आहे तिथे सध्या स्टेडिअम अस्तित्वातच नाहीए. 

161
Indo-Pak T20 World Cup Tie : टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामना आणि न्यूयॉर्कमधील स्टेडिअम यांची इतकी चर्चा का होतेय?
Indo-Pak T20 World Cup Tie : टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामना आणि न्यूयॉर्कमधील स्टेडिअम यांची इतकी चर्चा का होतेय?
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने यंदा क्रिकेट हा खेळ अधिकृतपणे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये पदार्पण करत आहे. आणि अमेरिकन क्रीडा खात्यालाही त्याची उत्सुकता आहे. कारण, पुन्हा २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्येही क्रिकेट हा खेळ आहे. न्यूयॉर्क शहरात अमेरिकन क्रिकेट मंडळाने अद्ययावत क्रिकेट स्टेडिअमही ‘तयार’ केलं आहे. (Indo-Pak T20 World Cup Tie)

त्यासाठी जी जागा निवडली आहे ते सध्या फक्त मैदान आहे. तिथं स्टेडिअम नाही. पण, सामन्यापूर्वी तिथं पॉप अप स्वरुपाचं स्टेडिअम उभारलं जाणार आहे. ९ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वचषकातील सगळयात लक्षवेधी सामना न्यूयॉर्कला होणार आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात हे स्टेडिअम आणि त्यावरील खेळपट्टी यांची चर्चा आधीच सुरू झाली आहे. (Indo-Pak T20 World Cup Tie)

फ्लोरिडातील क्रिकेट ग्राऊंड प्रमाणेच इथली खेळपट्टीही ऑस्ट्रेलियातील मेलबोर्नमध्ये तयार होऊन ती अमेरिकेत आयात केली जाणार आहे. मेलबोर्नच्या क्रिकेट मैदानातही खेळपट्टी बाहेर तीन तुकड्यांमध्ये तयार केली जाते. आणि एमसीजी मैदानात आणून ती बसवली जाते. तसंच अमेरिकेत करण्यात येणार आहे. (Indo-Pak T20 World Cup Tie)

(हेही वाचा – Central Railway Megablock : रविवारी बाहेर पडताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची)

३४,००० प्रेक्षक बसतील अशी सोय

आणि न्यूयॉर्कच्या आयसेन हॉवर स्टेडिअमची खेळपट्टी सध्या मेलबोर्नला मुख्य क्युरेटर डॅमियन हो यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे. ‘आम्ही मेलबोर्नमध्ये खेळपट्टीचे १० ट्रे बनवले आहेत. ते अमेरिकेला पाठवून दिले. आणि मागचा एक महिना तिथे राहून मी ते मैदानावर बसवले आहेत. आजूबाजूला माती घालून खेळपट्टीला आम्ही जमिनीत घट्‌ट बसवलं. आता तिच्यावर गवत लावण्याचं काम सुरू आहे. त्यानंतरच खेळपट्टी पूर्णपणे तयार होईल. आता गवत उगवण्याचं काम सुरू आहे,’ असं हो चॅनल सेव्हन या ऑस्ट्रेलियातील वाहिनीशी बोलताना म्हणाले. (Indo-Pak T20 World Cup Tie)

न्यूयॉर्कचं स्टेडिअमही मजेशीर असणार आहे. मैदानाभोवती तात्पुरत्या स्वरुपाचे प्रेक्षकांचे स्टँड बसवले जाणार आहेत. आणि अशा स्टँडमध्येही ३४,००० प्रेक्षक बसतील अशी सोय असेल. सामन्यानंतर हे स्टँड काढून टाकता येतील असे ते बनवले जातील. ते कामही सध्या सुरू आहे. (Indo-Pak T20 World Cup Tie)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.