Central Railway Megablock : रविवारी बाहेर पडताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

मुलुंड ते माटुंगा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने तांत्रिक कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे.

446
Central Railway Megablock : रविवारी बाहेर पडताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

मुलुंड ते माटुंगा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने तांत्रिक कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणादरम्यान शनिवारी (२०जानेवारी) मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत रेल्वेरुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.जाणून घेऊयात  कुठल्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Central Railway Megablock)

मुलुंड – माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या स्थानकांनुसार थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. (Central Railway Megablock)

(हेही वाचा : Mumbai Dabbawala: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मुंबईचे डबेवालेही साजरी करणार अनोखी दिवाळी)

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी,बेलापूर,पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल,बेलापूर, वाशीहून १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ठाणे-वाशी,नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.