भारत विरुद्ध श्रीलंका : टी-२० सामने लाईव्ह कुठे पहाता येणार? हार्दिकच्या नेतृत्वात नववर्षाची सुरुवात

145

भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. २०२३ मध्ये टीम इंडियाची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० सामन्यांच्या मालिकेला ३ जानेवारी मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. या संघांमधील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

( हेही वाचा : Delhi Dragging Case : दिल्लीतील धक्कादायक घटना! कारचालकांनी फरफटत नेलेली मुलगी सापडली विवस्त्र अवस्थेत)

रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकली होती. यावेळी भारताचा सामना आशिया कप चॅम्पियन श्रीलंकेशी होणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका सामना कुठे पहाणार? 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० पहिला सामना मंगळवारी ३ जानेवारीला होणार आहे. हा पहिला सामना मुंबईमधील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना ७ वाजता सुरू होईल नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. क्रिकेटप्रेमींना स्टार स्पोर्ट्स चॅनेलरवर आणि डिस्नी प्लस हॉटस्टारवर ही संपूर्ण मालिकेचे सामने लाईव्ह पहाता येतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.