India vs Pakistan: पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापलेल्या चाहत्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल

India vs Pakistan: पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापलेल्या चाहत्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल

250
India vs Pakistan
India vs Pakistan

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून भारतीय संघाने दिमाखात सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. (India vs Pakistan) मात्र, या पराभवाचे पडसाद पाकिस्तानात उमटले असून एका संतापलेल्या चाहत्याने चक्क बॅटने मारून आपला टीव्ही फोडून टाकला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून जगभरातील क्रिकेटप्रेमी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. (India vs Pakistan)

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांत गडगडला. विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आल्याने पाकिस्तानी चाहते प्रचंड निराश झाले आहेत. ही निराशा काही ठिकाणी संतापाच्या रूपात बाहेर पडताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चाहता आपल्या हातात क्रिकेटची बॅट घेऊन रागाच्या भरात टीव्हीवर प्रहार करताना दिसत आहे. (India vs Pakistan)

भारताचा दबदबा आणि पाकिस्तानची हार
या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सततच्या पराभवामुळे पाकिस्तानमध्ये क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषतः भारतासारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याकडून झालेल्या पराभवामुळे हा राग अनावर झाला आहे. (India vs Pakistan)

सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानी चाहत्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. अनेकांनी “टीव्ही फोडून काय साध्य होणार?” असे प्रश्न विचारले आहेत, तर काहींनी बासित अलीसारख्या माजी खेळाडूंच्या विधानांचा संदर्भ देत पाकिस्तानच्या मानसिकतेवर टीका केली आहे. यापूर्वीही अनेकदा भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानात टीव्ही फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत, मात्र यावेळचा व्हिडिओ अधिक आक्रमक असल्याने तो वेगाने पसरत आहे. (India vs Pakistan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.