India vs England : भारताचा विजयी षटकार; भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची उडाली दाणादाण 

158
India vs England : भारताचा विजयी षटकार; भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची उडाली दाणादाण 
India vs England : भारताचा विजयी षटकार; भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची उडाली दाणादाण 

एकदिवसीय विश्वचषकात भारताने सलग सहाव्या विजयाची नोंद केली. (India vs England) भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. तब्बल १०० धावा आणि १५ षटके राखून भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. या विजयामुळे भारताने आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. (India vs England)

(हेही वाचा – Manoj Jarange : सगळ्यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे म्हणाले की…)

२० वर्षांनंतर इंग्लंड विरोधात विजय

लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर २३० धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अवघ्या १२९ धावांत इंग्लंडचा संघ तंबूत परतला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे २० वर्षानंतर भारत विश्वचषकात इंग्लंडबरोबरच्या सामन्यात जिंकला आहे.

जसप्रीत बुमराहने भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर डेव्हिड मलान आणि जो रूटला बाद केले. मलान १७ चेंडूत १६ धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्यासोबत इंग्लंडच्या पडझडीला सुरुवात झाली. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर बेन स्टोक्सची बॅट चाललीच नाही, तर जॉनी  बेअरस्टोला १४ धावांवर तंबूत परतावे लागले. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने २९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला पायचीत केले. मोहम्मद शमीने आदिल रशीदला बाद करून इंग्लंडला नववा धक्का दिला. (India vs England)

कर्णधार म्हणून रोहितचा १०० वा सामना

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळवली गेलेली ही १०० वी एकदिवसीय मॅच होती. फलंदाजी करतांना सलामीवीर शुभमनला १३ चेंडूत ९ धावा करता आल्या. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला लय गवसली नाही. ९ चेंडूत एकही धाव त्याला करता आली नाही. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. ख्रिस वोक्सने शुभमन गिलला त्रिफळाचीत केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला झेलबाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यर १६ चेंडूत चार धावा करून, तर लोकेश राहुल ५८ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताला आणखी मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १०१ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. रवींद्र जडेजा १३ चेंडूत ८ धावा करून, तर मोहम्मद शमी ही लगेचच पॅवेलियनमध्ये परतले. रोहित शर्माने केलेल्या चिवट खेळीनंतर सूर्यकुमार यादवने खेळपट्टीवर टिकून राहत ४९ धावा केल्या. त्यानंतर एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. असे असले तरी पुन्हा गोलंदाजांनीच भारताचा डाव सावरला.  (India vs England)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.