Railway Accident : आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर; एकाचा मृत्यू , 10 जण जखमी

दोन ट्रेनची आपसात धडक बसल्यामुळे रुळावरून गाडीचे डबे घसरले

20
Railway Accident : आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर; एकाचा मृत्यू , 10 जण जखमी
Railway Accident : आंध्रप्रदेशातील विजयनगरम येथे दोन पॅसेंजर ट्रेनची टक्कर; एकाचा मृत्यू , 10 जण जखमी

विजयनगरमहून आंध्र देशातील रायगडकडे जाणारी ट्रेन त्याच मार्गावर विशाखापट्टणमहून पलासाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला धडकली. दोन ट्रेनची एकमेकांना धडक ( Two passenger trains collide) बसल्यामुळे ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विजयनगरम (Andhra Pradesh’s Vijaynagaram) जिल्ह्यात ही घटना घडली. (Railway Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात दोन गाड्यांची टक्कर झाल्यामुळे अपघात झाला असून बचाव पथक आपले कार्य करत आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 10 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Gas Cylinders Explode : मांजरीमधे सहा गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण )

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या अपघाताविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, दोन ट्रेनची आपसात धडक बसल्यामुळे रुळावरून गाडीचे डबे घसरले, मात्र रुळावरून किती डबे घसरले, याविषयीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. बचाव कार्य सुरू असून रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांनुसार, रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचे दिसत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.