India vs Aus World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अडथळ्यांनी भरलेला

भारताने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत मजल मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य सामनाही कमी आव्हानात्मक नव्हता. बघूया त्यांचा प्रवास कसा होता.

110
India vs Aus World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अडथळ्यांनी भरलेला
India vs Aus World Cup Final : ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अडथळ्यांनी भरलेला
  • ऋजुता लुकतुके

भारताने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत मजल मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य सामनाही कमी आव्हानात्मक नव्हता. बघूया त्यांचा प्रवास कसा होता. (India vs Aus World Cup Final)

ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा पहिला देश होता. पण, त्यांनी संघ जाहीर केला त्यात एकच फिरकीपटू होता ॲडम झंपा. भारतात स्पर्धा पार पडत असतानाही त्यांनी एकाच फिरकीपटूला स्थान दिलं होतं. त्यामुळे या संघाची जोरदार चर्चा झाली. शेवटी हाच झंपा स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला. अगदी अलीकडे शामीने त्याला मागे टाकलंय. (India vs Aus World Cup Final)

फक्त इतकंच नाही तर स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात संघाची अवस्था अशी होती की, दुखापतीमुळे खेळवायला ११ खेळाडू नव्हते. पण, अशा सगळ्या आव्हानांचा मुकाबला करत ऑस्ट्रेलियाने इथपर्यंत मजल मारली आहे. संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत अनिश्चित होता. शेवटी ९ सामन्यांत ७ विजय मिळवून तिसरं स्थान पटकावलं. (India vs Aus World Cup Final)

ऑस्ट्रेलियासाठी सगळ्यात लक्षवेधी सामना ठरला तो अफगाणिस्तान विरुद्धचा साखळी सामना. ऑस्ट्रेलियाचे तेव्हा दोन सामने बाकी होते आणि ते जिंकूनच उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार होता. पण, नेमका २७२ धावांचा पाठलाग करताना संघाची अवस्था ७ बाद ९१ झाली होती. पण, ग्लेन मॅक्सवेलने एकहाती २०१ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा उपांत्य सामनाही त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत जिंकला आहे. (India vs Aus World Cup Final)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : लोअर परळ पुलाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले…..)

एक नजर टाकूया संघाच्या कामगिरीवर…

New Project 82 3

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.