
-
ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा वैभव सुर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) या युवा खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याचं फळ त्यांना आयपीएलनंतर लगेचच मिळणार आहे. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंडचा कसोटी दौरा करत आहे. त्याचवेळी भारताचा १९ वर्षांखालील संघही इंग्लंडमध्ये असणार आहे. आणि या संघात वैभव तसंच आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) या दोघांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना दोघांना दौऱ्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे. (India U19 England Tour)
परदेशी दौऱ्यासाठी पारपत्र, व्हिसा अशा गोष्टींची व्यवस्था आवश्यक असते. त्यासाठी खेळाडूंना आधीच कल्पना देण्यात येते. आणि क्रिकेट मंडळांचं या दोन खेळाडूंशी बोलणं झाल्याचं समजतंय.
(हेही वाचा – Beggars : भिक्षागृहातील भिक्षेकऱ्यांचा मेहनताना ५ रुपयांवरून ४० रुपये; ५७ वर्षांनंतर पहिल्यांदाच वाढ)
𝙍𝙖𝙬. 𝙍𝙪𝙩𝙝𝙡𝙚𝙨𝙨. 𝙍𝙚𝙘𝙤𝙧𝙙-𝘽𝙧𝙚𝙖𝙠𝙞𝙣𝙜 😎
🎬 Relive Vaibhav Suryavanshi’s knock for the ages, up close and intensified! 🔥 #TATAIPL | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/PYMFn77VBY
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
या दौऱ्यात भारतीय युवा संघ ५ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ २१ जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होईल. या दौऱ्यात १४ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आणि आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) यांसारख्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. दोन्ही खेळाडू सध्या आयपीएल २०२५ मध्ये चांगलीच धमाल करत आहेत. वैभव हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. तर, आयुष चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळत आहे. (India U19 England Tour)
पुढील वर्षी जानेवारीमध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया इथं युवा विश्वचषक होणार आहे. त्याच्या तयारीच्या दृष्टीने या इंग्लिश दौऱ्याला महत्त्व आहे. इंग्लंडचा हा आगामी दौरा भारताच्या १९ वर्षांखालील संघासाठी महत्त्वाची तयारी म्हणून काम करेल. भारताचा १९ वर्षांखालील संघ शेवटचा सामना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये युएईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup) खेळला होता, जिथे ते अंतिम फेरीत पोहोचले होते परंतु अखेर बांगलादेशकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. (India U19 England Tour)
यंदा आयपीएलमध्ये (IPL) सोमवारी झालेल्या सामन्यात वैभवने ३५ चेंडूंत शतक पूर्ण करत धमाल उडवून दिली होती. तर आयुषनेही चेन्नईसाठी चांगली कामगिरी केली आहे.
(हेही वाचा – मुंबईतील ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार; DCM Eknath Shinde यांचे विधान )
भारतीय युवा संघाचा इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम (एकदिवसीय मालिका)
पहिला एकदिवसीय सामना: २७ जून, होव्ह
दुसरा एकदिवसीय सामना: ३० जून, नॉर्थम्प्टन
तिसरा एकदिवसीय सामना: २ जुलै, नॉर्थम्प्टन
चौथा एकदिवसीय सामना: ५ जुलै, वॉर्सेस्टर
पाचवा एकदिवसीय सामना: ७ जुलै, वॉर्सेस्टर
कसोटी मालिका :
पहिली कसोटी: १२-१५ जुलै
दुसरी कसोटी: २०-२३ जुलै, चेम्सफोर्ड
हेही पहा –
Join Our WhatsApp Community