India Tour of England : रिषभ पंतने सांगितलं चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?

India Tour of England : भारताच्या फलंदाजीच्या क्रमात मोठे बदल संभवतात. 

32
India Tour of England : रिषभ पंतने सांगितलं चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि इंग्लंड दरम्यानची पहिली कसोटी २० तारखेपासून हेडिंग्ले इथं सुरू होत आहे. या कसोटीत भारताच्या फलंदाजीच्या क्रमात मोठा बदल संभवतो. उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने याविषयी पत्रकारांना माहिती दिली. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे शिलेदार त्याने उघड केले आहेत. शुभमन गिल एक क्रमांक खाली खेळणार असून विराट कोहलीची जागा आता शुभमन गिल घेणार आहे. (India Tour of England)

‘तिसऱ्या क्रमांकावर नेमकं कोण खेळणार यावर अजूनही चर्चा सुरू आहे. पण, चौथ्या क्रमांकावर शुभमन येईल. मी माझा पाचवा क्रमांक कायम राखणार आहे,’ असं पंत स्पष्टपणे म्हणाला. तिसरी जागा अभिमन्यू ईश्वरन किंवा साई सुदर्शन यांच्यापैकी एखादा खेळाडू घेऊ शकतो. शुभमन गिलने सलामीवीर म्हणून कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. पण, यशस्वी जयस्वालच्या उदयानंतर डावी – उजवी सलामीची जोडी असावी म्हणून तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला लागला. आता चौथ्या क्रमांकावर येऊन मधल्या फळीला स्थैर्य देणं हे त्याचं काम असेल. (India Tour of England)

(हेही वाचा – Flight Cancellations : दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग ! कारण आलं समोर …)

‘शुभमन आणि मी मैदानाबाहेरही चांगले मित्र आहोत आणि आमच्यात चांगली चर्चा होते. आमच्यातील हे नातं मैदानातही एकत्र वावरताना दिसतं,’ असं पंत कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीबद्दल बोलताना म्हणाला. इंग्लिश संघही संक्रमणावस्थेतून जात आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या निवृत्तीनंतर त्यांनाही खमका तेज गोलंदाज सापडलेला नाही. तर भारताची फलंदाजांची फळी नवखी आहे. अशावेळी ही मालिका तुल्यबळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतरची भारतीय संघाची ही पहिलीच मालिका असेल. (India Tour of England)

२००७ नंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेला नाही. २०२१ साली भारतीय संघ २-१ असा आघाडीवर असताना कोव्हिडचा उद्रेक सुरू झाला. ही मालिका त्यानंतर २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आली. पण, पाचवी कसोटी भारताने गमावल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेपासून आयसीसीचं कसोटी अजिंक्यपदाचं नवीन चक्रही सुरू होत आहे. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.