India South Africa Tour : रोहित, विराटला टी-२० तसंच एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती, कसोटी संघातून अजिंक्य रहाणेला वगळलं

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.

74
Ind vs Eng 1st Test : कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचं कौतुक का केलं?
Ind vs Eng 1st Test : कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचं कौतुक का केलं?

ऋजुता लुकतुके

नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर (India South Africa Tour) भारतीय संघासमोर पुढील आव्हान उभं आहे ते दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं. आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टी-२०, एकदिवसीय तसंच कसोटी मालिकेसाठी तीन वेगवेगळ्या संघांची घोषणा गुरुवारी (३० नोव्हेंबर) केली आहे.

आणि ज्या अनेक चर्चांना विश्वचषक स्पर्धेनंतर उधाण आलं होतं, त्या चर्चाही आता थांबल्या आहेत. तीनही संघ पाहण्यापूर्वी काही ठळक बदल समजून घेऊया…

टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून विराट, रोहीतला विश्रांती

विराट आणि रोहित (India South Africa Tour) यांनी टी-२० तसंच एकदिवसीय मालिकेतून विश्रांती मिळावी अशी विनंती बीसीसीआयला केली होती. त्याचा मान राखत दोघांचा समावेश या दोन संघात झालेला नाही. थोडक्यात, टी-२० मालिकेत खेळण्यासाठी रोहित शर्माचं मन वळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असल्याची जी चर्चा सुरू होती, ती आता आपोआप थांबली आहे. या दोघांबरोबरच महम्मद शामीलाही थेट कसोटी संघात स्थान मिळालं आहे. तोपर्यंत तोही विश्रांती घेणार आहे.

(हेही वाचा – IND vs AUS 4th T20 : भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य!)

इतकंच नाही तर रोहित ऐवजी (India South Africa Tour) निवड समितीने टी-२० मालिकेत सुर्यकुमार यादव आणि एकदिवसीय मालिकेत के एल राहुल यांना नेतृत्वाची संधी दिली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सुर्यकुमारचं संघाचं नेतृत्व करतोय. तर एकदिवसीय विश्वचषकात यष्टीमागून के एल राहुल नियमितपणे कर्णधार रोहितला सल्ले देताना दिसला.

आता टी-२० आणि एकदिवसीय संघात (India South Africa Tour) नवीन खेळाडूंची चाचपणी सुरू झाली आहे, असे संकेतही या संघ निवडीतून दिसत आहेत. कारण, एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणारा के एल राहुल टी-२० संघाचा भाग नाही. तिथे यष्टीरक्षणाची जबाबदारी इशान किशनवर असेल.

रहाणे, पुजाराला कसोटी संघात स्थान नाही

अजित आगरकरच्या निवड समितीने (India South Africa Tour) आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय तो अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला वगळण्याचा. पैकी, रहाणे कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीबरोबरच वेस्ट दौऱ्यातही कसोटी संघात होता. आणि त्याच्याकडे संघाची उपकप्तानीही होती. पण, कसोटी संघात श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनी वर्णी लागलीय. त्यामुळे दोघांचा समावेश झालेला नाही. इथंही संघाची मधळी फळी नव्याने बांधण्याचा निवड समितीचा प्रयत्न दिसतो आहे.

जसप्रीत बुमराकडे कसोटी संघाचं उपकर्णधार (India South Africa Tour) पद सोपवण्यात आलंय. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्याकडे भारतीय संघ टी-२० विश्वचषकाची तयारी म्हणूनही बघत आहे. त्यामुळे सलामीवीर शुभमन गिलला टी-२० मालिकेत खेळवण्यात येणारए. त्यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती देण्यात येईल. आणि पुन्हा कसोटी संघात तो परतेल.

(हेही वाचा – Nashik: नाशिकमध्ये मराठी पाट्या लावण्याचे पालन नाही, आयुक्तांनी मागवला अहवाल)

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल आणि मुकेश कुमार हे तीनच खेळाडू असे आहेत ज्यांचा तीनही संघात समावेश आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टी-२० संघ :

सुर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, महम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर (India South Africa Tour)

एकदिवसीय संघ :

के एल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटिदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के एल राहुल, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर (India South Africa Tour)

कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, के एल राहुल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, महम्मद सिराज, महम्मद शामी, मुकेश कुमार, जसप्रीत बुमरा, प्रसिध कृष्णन (India South Africa Tour)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.