Test Cricket Ranking 2023 : भारताचे कसोटी मालिकेत वर्चस्व

आयसीसीने मंगळवार २ मे रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली. यामधून २०१९-२० च्या हंगामाचे निकाल वगळण्यात आले आहे.

198
Test Cricket Ranking 2023
Test Cricket Ranking 2023 : भारताचे कसोटी मालिकेत वर्चस्व

भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आता जागतिक कसोटी क्रमवारीत भारताने पहिले स्थान पटकावले आहे. (Test Cricket Ranking 2023)

आयसीसीने मंगळवार २ मे रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली. यामधून २०१९-२० च्या हंगामाचे निकाल वगळण्यात आले आहे. मार्च २०२० मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र ताज्या क्रमवारीत या मालिकेचा निकाल वगळण्यात आला आहे. त्यामुळे भारताचे ११९ वरून १२१ गुण झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यात भारताला यश मिळालं आहे. (Test Cricket Ranking 2023)

(हेही वाचा – कोहली-नवीन यांच्यातला वाद आणखी वाढणार का? दोघांच्या इन्स्टाग्राम स्टोअरी आहेत चर्चेत)

भारतीय संघाने डिसेंबर २०२१ नंतर प्रथमच कसोटी क्रमवारीत वर्चस्व मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाचे गुणांकन १२२ वरून ११६ वर घसरले आहे. २०१९ -२० च्या हंगामात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान (२-०) आणि न्यूझीलंड (३-०) या संघाविरूद्ध मालिका जिंकली होती. (Test Cricket Ranking 2023)

मात्र हे निकाल आता वगळण्यात आले आहेत. तसेच २०२१- २२ च्या हंगामात इंग्लंडविरूद्ध अॅशेस मालिकेत मिळावलेल्या ४-० अशा विजयाला ५० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी २०२२ पासून क्रमवारीत अग्रस्थानी होता. (Test Cricket Ranking 2023)

हेही पहा – 

ताज्या क्रमवारीनुसार भारताला अव्वल व ऑस्ट्रेलियाला दुसरे स्थान मिळाले आहे. तर इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात यापूर्वूी असलेले १३ गुणांचे अंतर आता केवळ दोन गुणांचे झाले आहेत. या खेरीज पहिल्या दहा क्रमांकात कुठलाही बदल झालेला नाही. (Test Cricket Ranking 2023)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.