Ind vs Pak : भारत – पाक सामन्यासाठी गुजरात पोलीस हाय अलर्टवर

विश्वचषकातील प्रतिष्ठेच्या भारत - पाक सामन्यापूर्वी अहमदाबाद शहराला छावणीचं रुप आलं असून गुजरात पोलीस हाय अलर्टवर आहेत.

183
Ind vs Pak : भारत - पाक सामन्यासाठी गुजरात पोलीस हाय अलर्टवर

ऋजुता लुकतुके

भारत पाकिस्तान सामन्यासाठी (Ind vs Pak) अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेले काही दिवस इथं ११,०००च्या वर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. गुजरात पोलीसही हाय अलर्टवर असल्याचं गुजरात राज्याचे पोलीस महासंचालक विकास सहाय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.

गुजरात पोलीस (Ind vs Pak) आणि राज्यातील इतर निमलष्करी सुरक्षा यंत्रणेचे ६,००० पोलीस स्टेडिअम भोवती तसंच शहरातील संवेदनशील भागात तैनात आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना काटेकोरपणे लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच विभागांमध्ये सुरक्षा यंत्रणा विभागण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ind vs Pak : भारत – पाक सामन्यासाठी केलेली खेळपट्टी कशी आहे? सामना कुठे आणि कधी बघता येईल?)

स्टेडिअम, (Ind vs Pak) खेळाडू व प्रेक्षकांची सुरक्षा, वाहतूक, स्टेडिअम आणि शहरात जागोजागी पार्किंगची समस्या, शहरातील संवेदनशील भागांची सुरक्षा तसंच क्रिकेटशी संबंधित काळ्या धंद्यांचा बिमोड अशा पाच आघाड्यांवर पोलीस सक्रिय आहेत.

‘भारत – पाक सामन्याची (Ind vs Pak) आम्ही जय्यत तयारी केली आहे. आम्ही अहमदाबाद पोलिसांचं विशेष तपास पथक, गुप्तचर विभाग, दहशतवाद विरोधी पथक अशा सगळ्यांची मदत या कामी घेतली आहे. सामन्याच्या काळा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असं सहाय यांनी सांगितलं.

चार आयपीएस दर्जाचे अधिकारी तसंच आयुक्त स्तरावरील अधिकारी या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.