Ind vs Pak : भारत – पाक सामन्यासाठी केलेली खेळपट्टी कशी आहे? सामना कुठे आणि कधी बघता येईल?

23
Ind vs Pak : भारत - पाक सामन्यासाठी केलेली खेळपट्टी कशी आहे? सामना कुठे आणि कधी बघता येईल?

ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) या विश्वचषकातील सगळ्यात प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअम सज्ज आहे. इथली खेळपट्टी कशी आहे, हवामानाचा अंदाज काय आहे, अशा गोष्टी समजून घेऊया.

नेहमीप्रमाणेच या सामन्याची तिकीटं विक्रीसाठी खुली झाल्या झाल्या संपली आहेत. काही दिवसांपूर्वी अतिरिक्त १४,००० तिकिटं विक्रीसाठी खुली करण्यात आली. ती ही झटपट संपली. त्यामुळे मैदानावर १,३२,००० प्रेक्षकांसमोर भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आपलं क्रिकेटचं कौशल्य आजमावतील. शिवाय टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सामना बघणाऱ्यांची संख्या तर कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळे या सामन्याची हवा तर चांगलीच तयार झाली आहे.

आता या सामन्यासाठी तयार केलेली नरेंद्र मोदी स्टेडिअमची (Ind vs Pak) खेळपट्टी कशी दिसतेय आणि इथलं वातावरण कसं आहे, हे एकदा पाहूया.

या विश्वचषकात आतापर्यंत एकमेव सामना इथं झालाय तो सलामीचा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना. यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २८२ धावा केल्या. पण, किवी संघाने हे आव्हान ३७व्या षटकांतच परतून लावलं. खेळपट्टीकडून गोलंदाजांना जराही मदत मिळाली नाही.

या सामन्यानंतर आता जेमतेम दहा दिवस उलटले आहेत. तोपर्यंत वातावरणही दमट आणि कोरडंच होतं. आताही इतक्या कमी वेळेत खेळपट्टीत बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. शिवाय फलंदाजांना पोषक खेळपट्टी असेल तर चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीने प्रेक्षकांचंही मनोरंजन होतं. आणि भारत – पाक (Ind vs Pak) सामन्यासाठी तर मान्यवर प्रेक्षही मैदानात असणार आहेत. त्यामुळे खेळपट्टीच्या स्वरुपात या सामन्यासाठी काही बदल होतील अशी शक्यता कमी आहे.

(हेही वाचा – Ind vs Pak : ‘गरज पडल्यास संघात बदल करण्यासाठी तयार’ – रोहीत शर्मा)

खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी असेल आणि दुसरी फलंदाजी करणारा संघ आरामात धावांचा पाठलाग करू शकतो. संध्याकाळी इथं पडणारं दवं हा एकमेव काळजीचा दुवा असू शकतो.

गुजरातच्या हवामान विभागाने अलीकडेच १४ आणि १५ तारखांना हलक्या पावसाच्या (Ind vs Pak) सरींचा अंदाज वर्तवला होता. पण, सध्यातरी तिथे वातावरण कोरडंच आहे. आणि आकाशात अभ्राच्छादन फक्त १५ टक्के आहे.

हा सामना टिव्हीवर कुठे पाहायचा?

टेलिव्हिजन तसंच डिजिटल प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि डिस्ने हॉटस्टारकडे आहेत. स्टार स्पोर्ट्सच्या (Ind vs Pak) विविध क्रीडा वाहिन्यांवर तसंच प्रादेशिक वाहिन्यांवर तुम्ही सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल. प्रादेशिक वाहिन्यांवर त्या त्या प्रादेशिक वाहिन्यांमध्ये समालोचनही तुम्हाला ऐकता येईल.

याशिवाय डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सात प्रादेशिक भाषांमध्ये हे प्रसारण (Ind vs Pak) उपलब्ध होईल. प्रत्यक्ष सामना दुपारी दोन वाजता रंगणार आहे. आणि नाणेफेक दीड वाजता होईल. पण, त्यापूर्वी प्री मॅच शो अगदी सकाळी साडे नऊ पासून सुरू होणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.