Ind vs Eng, 4th Test : अंशुल कंबोजचं कसोटी पदार्पण; तर करुण नायरला वगळलं

Ind vs Eng, 4th Test : मँचेस्टर कसोटीसाठी असा आहे भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ. 

293
Ind vs Eng, 4th Test : अंशुल कंबोजचं कसोटी पदार्पण; तर करुण नायरला वगळलं
  • ऋजुता लुकतुके

अपेक्षेप्रमाणेच युवा तेज गोलंदाज अंशुल कंबोजला मँचेस्टर कसोटीत संधी मिळाली आहे. नाणेफेकीपूर्वी काही मिनिटं आधी मैदानावरच एक छोटेखानी कार्यक्रम झाला. यात माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ताने अंशुलला भारतीय कॅप प्रदान केली. या टोपीवर आकडा होता ३१८. म्हणजेच भारताकडून कसोटी खेळणारा अंशुल हा ३१८ वा खेळाडू आहे. दासगुप्ताने त्याला कॅप देतानाच युक्तीच्या चार गोष्टीही सांगितल्या. (Ind vs Eng, 4th Test)

हा देशांतर्गत हंगाम आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने कंबोजने गाजवला होता. तर अलीकडेच इंग्लंड लायन्स विरुद्ध भारतीय ए संघादरम्यानच्या मालिकेतही तो चमकला होता. रविवारी आकाश दीपची तंदुरुस्तीची चाचणी अपयशी ठरली तेव्हाच अंशुल कंबोजचा संघातील समावेश नक्की झाला होता. (Ind vs Eng, 4th Test)

(हेही वाचा – britain billionaire : ‘ब्रिटन नरक बनले आहे, ते मला नॉर्वेची आठवण करून देते’; अब्जाधीशाने का सोडले ३०० वर्षे जुने घर)

विशेष म्हणजे अंशुल कंबोज बरोबरच माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेनंही मँचेस्टरमध्येच कसोटी पदार्पण केलं होतं. अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत एका डावांत दहाच्या दहा फलंदाज बाद करण्याचा विक्रम आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंशुल कंबोजने ही कामगिरी केलेली आहे. नितिश कुमार, आकाशदीप आणि अर्शदीप सिंगला ऐनवेळी झालेल्या दुखापतींमुळे अंशुल कंबोजला तातडीने भारतातून बोलावून आणण्यात आलं होतं. रविवारी तो मँचेस्टरमध्ये दाखल झाला. बुधवारी लगेच तो आपली पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळणार आहे. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली आहे. त्यामुळे अंशुलला गोलंदाजीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. (Ind vs Eng, 4th Test)

भारतीय संघाने या कसोटीसाठी संघात चार बदल केले आहेत. करुण नायर ऐवजी साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. तर नितिश कुमार रेड्डीची जागा अष्टपैलू शार्दूल ठाकूरने घेतली आहे. प्रसिध कृष्णाऐवजी मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतलाय. तर आकाशदीपची जागा अंशुल कंबोजने घेतली आहे. (Ind vs Eng, 4th Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.