Ind vs Eng 2nd Test : ‘हे’ दोन भारतीय क्रिकेटपटू जागतिक क्रिकेट गाजवतील, विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप

विरेंद्र सेहवागच्या मते भारतीय संघातील दोन उगवते खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुढची १० वर्षं गाजवू शकतील. 

277
Ind vs Eng 2nd Test : ‘हे’ दोन भारतीय क्रिकेटपटू जागतिक क्रिकेट गाजवतील, विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुढची दहा वर्ष शुभमन गिल आणि यशस्वी जयसवाल हे क्रिकेटपटू गाजवतील, असं भाकीत केलं आहे. या दोघांनीही सध्या सुरू असलेली विशाखापट्टणम कसोटी भारतासाठी गाजवली आहे. यशस्वीने पहिल्या डावात २०९ धावा करताना सेहवागच्या शैलीत धुंवाधार फलंदाजी करताना १९ चौकार आणि ७ षटकार खेचले. या खेळीमुळेच भारताने पहिल्या डावात ४०० च्या जवळची धावसंख्या उभारली. (Ind vs Eng 2nd Test)

तर दुसऱ्या डावात भारतीय संघाला मजबूत आघाडीची अपेक्षा असताना शुभमन गिलने ळतक झळकावलं. १०४ धावा करताना त्याने भारताची दुसऱ्या डावातील आघाडी ३९८ धावांपर्यंत वाढवली. आणि दुसऱ्या डावात भारताला २५५ धावांचा टप्पा गाठून दिला. आता हेच दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवतील, असं विरेंद्र सेहवागला वाटतंय. (Ind vs Eng 2nd Test)

‘ज्या पद्धतीने २३ वर्षाच्या खालचे हे दोन क्रिकेटपटू आव्हानासमोर उभे राहिले, ते पाहून खूप छान वाटलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढची दहा वर्ष हे दोन खेळाडू आपली मोहोर उमटवलीत, असं खात्रीने वाटतं,’ असं सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. (Ind vs Eng 2nd Test)

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शुभमन गिलच्या शतकाचं कौतुक केलं आहे. फारसा फॉर्मात नसलेल्या शुभमनने केलेल्या शतकाचं टायमिंगही सुरेख होतं, असं सचिनने म्हटलंय. ‘तुझ्या कौशल्यपूर्ण शतकासाठी तुला खूप शुभेच्छा!’ असं सचिनने ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Muslim Cleric Mufti च्या समर्थनात आलेल्या जमावाला राजकीय पक्षाच्या नेत्याचा पाठिंबा?)

इरफान पठाणनेही शुभमनच्या या शतकाचं मोल भारतीय संघाच्या कसोटीतील वाटचालीत खूप महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. ‘शुभमनच्या इतर आंतरराष्ट्रीय शतकांपेक्षा या शतकाचं मोल त्याच्यासाठी अधिक असेल. कारण, भारतीय संघाला या शतकाने तारलं आहे,’ असं इरफानने ट्विटरवर लिहिलं आहे. (Ind vs Eng 2nd Test)

भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत तिसऱ्या दिवशी सर्वबाद २५५ धावा केल्या. आणि त्यानंतर इंग्लंडसमोर ही कसोटी जिंकण्यासाठी ३९८ धावांचं आव्हान आहे. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.