Muslim Cleric Mufti च्या समर्थनात आलेल्या जमावाला राजकीय पक्षाच्या नेत्याचा पाठिंबा?

मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरी याला अटक करण्यासाठी आलेल्या गुजरात एटीएसच्या पथकाला विरोध करण्यासाठी हा जमाव एकत्र आला होता. मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती याने ३१ जानेवारी रोजी गुजरात राज्यातील जुनागड येथे एका धार्मिक मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केले होते.

177
Muslim Cleric Mufti च्या समर्थनात आलेल्या जमावाला राजकीय पक्षाच्या नेत्याचा पाठिंबा?

मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती (Muslim Cleric Mufti) सलमान अझहरीला अटक करण्यासाठी आलेल्या गुजरात पोलिसांना विरोध करणारा जमाव हा राजकीय पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून आला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र घाटकोपर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप या नेत्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. घाटकोपर पोलिसांनी सोमवारी २५० ते ३०० अनोळखी इसमाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. २५० ते ३०० जणांचा जमाव हा रविवारी रात्री घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाला होता. (Muslim Cleric Mufti)

मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती (Muslim Cleric Mufti) सलमान अझरी याला अटक करण्यासाठी आलेल्या गुजरात एटीएसच्या पथकाला विरोध करण्यासाठी हा जमाव एकत्र आला होता. मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती (Muslim Cleric Mufti) याने ३१ जानेवारी रोजी गुजरात राज्यातील जुनागड येथे एका धार्मिक मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केले होते. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या प्रक्षोभक भाषणावरून जुनागड पोलिसांनी आयोजक आणि मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती (Muslim Cleric Mufti) सलमान अझरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मौलाना मुफ्ती (Muslim Cleric Mufti) हा मुंबईतील घाटकोपर परिसरातील अमृत नगर येथे राहणारा आहे, त्याला या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गुजरात एटीएसचे पथक रविवारी मुंबईत दाखल झाले होते. (Muslim Cleric Mufti)

(हेही वाचा – korba chhattisgarh साधन संपन्न करणारा जिल्हा)

राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नावाचा उल्लेख नाही

या दरम्यान स्थानिक मुस्लिम समुदायाने मौलाना मुफ्तीला (Muslim Cleric Mufti) घेऊन जाण्यास विरोध केला होता, त्यानंतर ही घाटकोपर पोलीसांच्या मदतीने गुजरात एटीएस मौलाना मुफ्तीला घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात सायंकाळी दाखल झाले. मौलाना मुफ्तीला (Muslim Cleric Mufti) घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचे कळताच २५० ते ३०० चा जमाव अचानक पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाला, व त्यांनी मौलाना मुफ्तीला सोडण्यासाठी घोषणाबाजी सुरू केली होती, त्यानंतर या जमावाने लालबहादूर शास्त्री मार्ग रोखून धरला. पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन करून त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. (Muslim Cleric Mufti)

मात्र हा जमाव आणखी आक्रमण होऊन त्यातील काही जणांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगविण्यात आले. अचानक पोलीस ठाण्यावर आलेला हा जमाव हा एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून आला असल्याची चर्चा रविवारी रात्री परिसरात सुरू होती. मात्र पोलिसांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र गुन्ह्यात या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. (Muslim Cleric Mufti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.