Ind vs Eng 2nd Test : भारतीय संघात निवड झाल्यावर सर्फराज खानची पहिली प्रतिक्रिया

216
Ind vs Eng 2nd Test : भारतीय संघात निवड झाल्यावर सर्फराज खानची पहिली प्रतिक्रिया
Ind vs Eng 2nd Test : भारतीय संघात निवड झाल्यावर सर्फराज खानची पहिली प्रतिक्रिया
  • ऋजुता लुकतुके

१६व्या वर्षी दिमाखात रणजी पदार्पण केलेल्या सर्फराज खानने त्यानंतर भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात (Ind vs Eng 2nd Test) पदार्पणासाठी मात्र गेली ८ वर्षं वाट पाहिली आहे. रणजी स्पर्धेत ३०० च्या वर धावांचा विक्रम आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातलेला सर्फराज गेली काही वर्षं भारतीय संघाच्या वेशीवर उभा होता. आता इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध २ सामन्यांत केलेल्या २०० धावांची दखल मात्र अजित आगरकरच्या निवड समितीने घेतली आहे.

आणि के एल राहुल जायबंदी झाल्यानंतर त्याच्या जागी विशाखापट्टणम कसोटीत सर्फराज खेळणार हे जवळ जवळ नक्की आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात वर्णी लागली तेव्हा सर्फराज भारतीय ए संघाबरोबरच होता. आणि सरावाचं सत्र संपल्यावर त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

(हेही वाचा – Financial Offenses: बिल्डर ललित टाकचंदानी याला ९ तासांच्या चौकशी नंतर अटक)

या इन्स्टाग्राम स्टोरीसाठी सर्फराझने ‘बादलपे पाँव है,’ हे चक दे इंडिया सिनेमातील प्रेरणादायी गाणं वापरलं आहे. आणि स्टोरीतील पहिला फोटो वडील नौशाद खान यांच्याबरोबरचा आहे. नौशाद हे स्वत: क्रिकेट प्रशिक्षक आहेत. आणि त्यांनी आपल्या तीनही मुलांना क्रिकेटचे धडे दिले आहेत. सर्फराजची भारतीय संघात वर्णी लागत असताना त्याचा धाकटा भाऊ मुनीर १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलियं संघाविरुद्ध नुकतंच त्याने शतक ठोकलं होतं.

सर्फराझचा दुसरा फोटो हा मुंबईतील क्रॉस मैदानाचा आहे. इथल्या नेट्समध्येच सर्फराझने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ‘तुम्ही स्वप्न बघायची सोडू नका. कारण, ती पाहिलीत तर ती पूर्णही होतात,’ असं विक्रमवीर सचिन तेंडुलकर आपल्या २०० व्या कसोटी सामन्यानंतर म्हणाला होता. सर्फराज बॉलबॉय म्हणून त्यावेळी मैदानात उपस्थित होता. आणि त्याने हे वाक्य नीट लक्षात ठेवलं होतं. नंतरच्या काही मुलाखतीत त्याने आठवण म्हणून तो प्रसंग सांगितलाही होता. के. एल. राहुलऐवजी मधल्या फळीत सर्फराझचा समावेश जवळ जवळ निश्चित मानला जातोय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.