Ind vs Eng 2nd Test : दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाचं नवीन घर बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत

मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे रवींद्र जाडेजा दुसरी कसोटी खेळू शकणार नाही.

143
Ind vs Eng 2nd Test : दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाचं नवीन घर बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत
Ind vs Eng 2nd Test : दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाचं नवीन घर बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या (Ind vs Eng 2nd Test) पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा केलेला अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जायबंदी झाला. जो रुटच्या गोलंदाजीवर चपळाईने धाव घेताना बेन स्टोक्सने त्याला धावचीत केलं. पण, सगळ्यात वाईट म्हणजे जडेजा बाद तर झालाच. शिवाय धावताना त्याचा पायही दुखावला. आणि स्कॅनमध्ये मांडीचा स्नायू दुखावल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पुढचे काही दिवस जाडेजाला (Ravindra Jadeja) बंगळुरूच्या (Bangalore) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वैद्यकीय तज्जांच्या देखरेखीखाली रहावं लागणार आहे.

जडेजा तिथे पोहोचलाही आहे. आणि ‘पुढचे काही दिवस हेच माझं घर असेल,’ अशा आशयाची एक इन्स्टाग्राम स्टोरी त्याने शेअर केली आहे. पहिल्या हैद्राबाद कसोटीत भारताला दुहेरी फटका बसला आहे. फक्त जडेजाच नाही तर दुसरा महत्त्वाचा फलंदाज के एल राहुलही कंबर दुखावल्यामुळे दुसरी कसोटी खेळू शकणार नाहीए. या दोघांनी पहिल्या डावात भारतीय डावाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि फॉर्ममध्ये असलेले दोन वरिष्ठ फलंदाज जायबंदी झाल्यामुळे भारतीय मधली फळी दुबळी झाली आहे. शुभमन गिलही फॉर्मशी झगडतोय.

रवींद्र जडेजाला दुखापतीतून बरं होण्यासाठी किती वेळ लागेल हे इतक्यात सांगता येणार नाही. पहिल्या कसोटीत जाडेजाने ५ बळी मिळवले. आणि ८७ धावाही केल्या होत्या. अष्टपैलूत्व हा भारतीय वातावरणात त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. त्यामुळे सध्या तरी भारतीय संघात त्याची जागा घेणारा दुसरा खेळाडू नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर आहे. आणि दुसरी कसोटी विशाखापट्टणम इथं २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.