World Cup 2023 : विराट खेळीसह बांगलादेशला धूळ चारत भारताचा विजयी चौकार

या शतकानंतर विराटच्या नावावर वन डे क्रिकेट मध्ये ४८ शतकांची नोंद झाली आहे.

98
World Cup 2023 : विराट खेळीसह बांगलादेशला धूळ चारत भारताचा विजयी चौकार
World Cup 2023 : विराट खेळीसह बांगलादेशला धूळ चारत भारताचा विजयी चौकार

विराट कोहलीने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करताना भारताने वर्ल्ड कप मधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. ९७ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी करून विराटने भारताच्या विजयाचा मार्ग सोपा केला, वर्ल्डकप मध्ये धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने केलेले हे पहिलेच शतक आहे. तर या शतकानंतर विराटच्या नावावर वन डे क्रिकेट मध्ये ४८ शतकांची नोंद झाली आहे. (World Cup 2023)

पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-बांगलादेश सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला २५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. लिटन दास (६६) आणि तन्जिद हसन (५१) यांनी ९३ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर बांगलादेशचा डाव गडलगडला. स्लॉग ओव्हरमध्ये महोम्मदुल्ला आणि मुशफिकूर रहीम यांनी थोडा प्रतिकार केला त्यामुळे बांगलादेशला २५० धावांच्या जवळ पोहचता आले. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाने २ विकेट्स घेतल्या. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला होता. ९३ धावांच्या सलामीनंतर भारताने बांगलादेशचा निम्मा संघ १७९ धावांत माघारी पाठवला होता. अशात अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीम ३८ धावांवर खेळत होता. ४३ व्या षटकात भारताकडून जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाने अप्रतिम कॅच घेतला. बुमराहने ऑफ स्टंपच्या बाहेर धीम्या गतीने चेंडू टाकला होता. त्यावर रहीमने हवेत शॉट मारला. पण रविंद्र जडेजाने डाव्या बाजूला हवेत उडी मारली आणि चेंडू धरला. (World Cup 2023)

(हेही वाचा : Ind vs Ban : रवींद्र जडेजा की के एल राहुल, कुणाचा झेल ठरणार सामन्यात सर्वोत्तम )

सामन्याचे नववे षटक टाकणारा हार्दिक पांड्या तीन चेंडू टाकून दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याचे उरलेले तीन चेंडू हे विराट कोहलीने टाकले आणि षटक पूर्ण केले. पायाला दुखापत झाल्याने हार्दिक बाहेर गेला आहे. २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरवात करून दिली. ८८ धावांवर भारताचा पहिला गाडी बाद झाला. सात चौकार आणि २ षट्करांच्या मदतीने ४८ धाव करून रोहित शर्मा पॅव्हेलियन मध्ये परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने आक्रमक सुरवात केली. १९ व्या षटकात शुभमन गिल बाद झाला तत्पूर्वी त्याने अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर विराटला श्रेयस अय्यरने साथ दिली. श्रेयस याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानंतर १९ धावांवर तो बाद झाला. त्यांनतर मैदानात आलेल्या लोकेश राहूलने विराट कोहलीला चांगली साथ दिली.

जडेजाच्या ‘त्या’ कॅच ची चर्चा
भारताचा अव्वल फिल्डर रविंद्र जडेजाने आयसीसी वर्ल्डकप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या लढतीत एक अफलातून कॅच घेतला. बांगलादेशच्या डावात मुश्फिकुर रहीमचा असा कॅच जडेजाने घेतला ज्याच्यावर काही वेळ कोणालाच विश्वास बसला नाही. रहीमची विकेट भलेही जसप्रीत बुमराहच्या नावावर जमा झाली असली तरी खऱ्या अर्थाने ही विकेट जडेजाची ठरली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.