Ind Vs Ban : आशिया चषकात भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभवाचा धक्का

अंतिम फेरीत आधीच प्रवेश मिळालेला असल्यामुळे भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी संघात ५ बदल केले होते.

115
Ind Vs Ban : आशिया चषकात भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभवाचा धक्का

ऋजुता लुकतुके

आशिया चषकातील सुपर ४ च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध भारतीय (Ind Vs Ban) संघाला ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी २६६ धावांची गरज असताना ४८.५ षटकांत भारतीय संघ २५९ धावांवर आटोपला. अडिचशेच्या वर धावा जमवायच्या तर त्यासाठी निदान एक तरी मोठी भागिदारी हवी. पण, भारतीय डावात त्याचीच उणीव होती. सलामीवीर शुभमन गिलने १२१ धावा केल्या. पण, त्याला अक्षर पटेल सोडला तर आणखी कुणाची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. अक्षक पटेलने ४२ धावा केल्या. पण, या दोघांना इतरांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.

शुभमन गिलची (Ind Vs Ban) लढत एकाकीच ठरली. त्याने १२१ धावा केल्या त्या १३३ चेंडूत, ५ षटकार आणि ८ चौकाराच्या सहाय्याने.

गिलनंतर अक्षर पटेलने ३४ चेंडूत ४२ धावा करत भारताला (Ind Vs Ban) विजयपथावर नेण्याचा प्रयत्न केला. पण, आवश्यक धावगती राखणं भारतासाठी अवघडच गेलं. आणि त्या प्रयत्नांत तळाचे फलंदाज बाद होत गेले. अखेर डावातील शेवटचा चेंडू बाकी असताना बांगलादेशचा संघ ५ धावांनी विजयी झाला.

स्पर्धेत भारत आणि श्रीलंका (Ind Vs Ban) संघांनी अंतिम फेरी आधीच गाठलेली आहे. त्यामुळे या निकालाचा त्यावर परिणाम होणार नाही. पण, म्हणूनच भारतीय कर्णधार रोहीत शर्माने जम बसलेल्या संघात पाच बदल केले. ते कदाचित भारतीय संघाच्या अंगलट आले.

हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या जागी तिलक वर्मा आणि सुर्यकुमार यादव (Ind Vs Ban) आले. तर गोलंदाजीत महम्मद शामी, प्रसिध कृष्णा यांना संधी मिळाली. कुलदीप यादवच्या जागी अक्षर पटेल संघात आला. पण, फलंदाजीत भारतीय संघाला एकजीवपणा दाखवता आला नाही. के एल राहुल आणि सुर्यकुमार जम बसल्यावर लगेच बाद झाले.

(हेही वाचा – Gujarat Shiv Yatra : गुजरातमध्ये शिव यात्रेवर मुस्लिमांकडून दगडफेक; ३ पोलिसांसह ६ जण जखमी; १५ जणांना अटक)

त्यापूर्वी बांगलादेश संघाने (Ind Vs Ban) २६६ धावांची मजल मारली ती कर्णधार शकीब हसनच्या ८० धावा आणि तौहिद ह्रिदयच्या ५४ धावांच्या जोरावर. त्यांचीही फलंदाजीची सुरुवात खराब झाली होती. आणि पहिले चार गडी ५९ धावांतच बाद झाले होते. पण, पुढे दोन मोठ्या भागिदारी झाल्या. कारण, आठव्या क्रमांकावर आलेल्या नसुम अहमदने ४४ आणि नवव्या क्रमांकाच्या मेहेदी हसनने २९ धावा केल्या.

बांगलादेश आणि भारतीय संघांमध्ये (Ind Vs Ban) हाच फरक ठरला. कारण, या उलट भारतीय डावात एकही अर्धशतकी भागिदारी झाली नाही. अपवाद गिल आणि के एल राहुल यांच्यातील ५७ धावांच्या भागिदारीचा. दुसरं म्हणजे बांगलादेशची गोलंदाजी किफायतशीर होती. त्यांनी धावा लुटल्या नाहीत. कर्णधार शकीब हसनने अष्टपैलू खेळ करत १० षटकात ४३ धावा देत सुर्यकुमार यादवचा महत्त्वाचा बळीही घेतला.

त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत १७ तारखेला भारत आणि श्रीलंकेचे संघ आमने सामने येणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.