Ind vs Aus T20 Series : भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुर्यकुमार यादव?

विश्वचषक संपल्या संपल्या भारतीय संघाला पुन्हा ऑस्ट्रेलियाशी पण, टी-२० मालिकेत दोन हात करायचे आहेत. आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत या मालिकेसाठी कर्णधारपदाची माळ सुर्यकुमार यादवच्या गळ्यात पडेल अशी चिन्ह आहेत

158
Ind vs Aus T20 Series : भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुर्यकुमार यादव?
Ind vs Aus T20 Series : भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुर्यकुमार यादव?

ऋजुता लुकतुके

अष्टपैलू खेळाडू आणि टी-२० (Ind vs Aus T20 Series) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून अजून सावरेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका तो खेळणार नाहीए. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व सुर्यकुमार यादवकडे जाण्याची दाट शक्यता आहे. ५ सामन्यांची ही टी-२० मालिका २३ नोव्हेंबरला विशाखापट्टणम इथं सुरू होणार आहे. तर अंतिम टी-२० सामना ३ डिसेंबरला हैद्राबादला होईल.

विश्वचषकात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली. तो पूर्ण बरा व्हायला दोन महिने तरी लागणार आहेत. अशावेळी अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवड समिती सुर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवू शकते. कारण, १९ नोव्हेंबरच्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतर संघातील ज्येष्ठ खेळाडूही विश्रांती घेतील.

(हेही वाचा-Ind vs Aus, World Cup Final : अहमदाबादच्या खेळपट्टीची इतकी चर्चा का? )

रोहित, विराट, श्रेयस, बुमरा, शामी हे खेळाडू विश्वचषका दरम्यान अव्याहत प्रवास करत असल्यामुळे या मालिकेसाठी त्यांना विश्रांती देण्यात येईल. तसंच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही विश्रांतीचाच निर्णय घेतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे संघाचे प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण संघाबरोबर राहतील असं बोललं जातंय.

सुर्यकुमार यादव हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात भारतीय संघाचा उपकर्णधार होता. तसंच मुंबई आणि २३ वर्षांखालील संघाचं नेतृत्व त्याने यापूर्वी केलं आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.