Ind vs Afg 3rd T20 : बंगळुरूमध्ये भारतीय डावाच्या शेवटच्या षटकांत निघाल्या विक्रमी ३६ धावा 

रोहित आणि रिंकू सिंग यांनी डावाच्या शेवटच्या ५ षटकांत तब्बल १०३ धावा फटकावल्या. आणि यातल्या ३६ एकट्या विसाव्या षटकातील होत्या. 

191
Ind vs Afg 3rd T20 : बंगळुरूमध्ये भारतीय डावाच्या शेवटच्या षटकांत निघाल्या विक्रमी ३६ धावा 
Ind vs Afg 3rd T20 : बंगळुरूमध्ये भारतीय डावाच्या शेवटच्या षटकांत निघाल्या विक्रमी ३६ धावा 
  • ऋजुता लुकतुके

टी-२० क्रिकेटमध्ये संघाची धावसंख्या दोनशेच्या वर जाते तेव्हा फलंदाजीचे अनेक विक्रम मोडतातच. बंगळुरूतील भारत वि अफगाणिस्तान सामना याला अपवाद नव्हता. रोहित शर्माने फलंदाजीचे काही विक्रम मोडले. आणि रिकू सिंगबरोबर १९० धावांची नाबाद भागिदारी करून दोघांनी भागिदारीचेही काही विक्रम मोडले. (Ind vs Afg 3rd T20)

दोघंही जात्याच आक्रमक फलंदाज आहेत आणि बंगळुरूत त्यांनी शेवटच्या ५ षटकांत तब्बल १०३ धावा कुटल्या. यातही करीम जनतचं शेवटचं षटक भारतासाठी विशेष लाभदायी ठरलं. दोघांनी या षटकांत ३६ धावा वसूल केल्या. एका नोबॉलवर रोहितने षटकार वसूल केल्यामुळे हे शक्य झालं. (Ind vs Afg 3rd T20)

रोहितनेच षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार वसूल केला. पण, दुसरा चेंडू नोबॉल होता. त्यामुळे फ्री हिट मिळाली आणि त्यावरही रोहितने षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवर एकेरी धाव घेत रोहितने सूत्र रिंकू सिंगकडे सोपवली. आणि रिंकूने शेवटच्या ३ चेंडूंवर ३ उत्तुंग षटकार ठोकत षटक पूर्ण केलं. एका षटकांत ५ षटकार, १ चौकार आणि १ एकेरी धाव निघाली. (Ind vs Afg 3rd T20)

(हेही वाचा – Sion Traffic Changes : सायनमध्ये वाहतुकीमध्ये मोठे बदल, कुठे नो पार्किंग; कधीपासून बंद?)

दोघांनी युवराज सिंग आणि कायरन पोलार्ड यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. युवराज आणि पोलार्ड यांनी इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकांत ३६ धावा वसूल करण्याचा पराक्रम केला होता. या दोघांनी एकट्याने षटकात ३६ धावा वसूल केल्या होत्या. (Ind vs Afg 3rd T20)

खरंतर या सामन्यात भारताची सुरुवात ४ बाद २२ अशी अडखळती झाली होती. पण, रोहित आणि रिंकू सिंगच्या नाबाद १९० धावांच्या भागिदारीमुळे भारताचा डाव सावरला आणि भारत २०० धावांचा टप्पा पार करू शकला. रोहितने आपलं पाचवं आंतरराष्ट्रीय शतकही ठोकलं. (Ind vs Afg 3rd T20)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.