Ind vs Afg 2nd T20 : अफगाणिस्तान विरुद्धच्या विजयात युवा यशस्वी आणि शिवम चमकले

शिवम दुबेने लागोपाठ दुसरं अर्धशतक ठोकत फलंदाजीच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर दावा ठोकला आहे

163
Ind vs Afg 2nd T20 : अफगाणिस्तान विरुद्धच्या विजयात युवा यशस्वी आणि शिवम चमकले

ऋजुता लुकतुके

अफगाणिस्तान विरुद्धचा दुसरा सामना (Ind vs Afg 2nd T20) इंदूरच्या अहिल्याबाई होळकर मैदानावर होता. इथं सीमारेषाही जवळ आहे. तसंच खेळपट्टीवर गवतही अजिबात नाही. त्यामुळे दोनशेच्या वर धावा आरामात होतील, असा सगळ्यांचा अंदाज होता. भारतीय कर्णधार रोहीत शर्माने त्यामुळेच नाणेफेक जिंकल्यावर अफगाणिस्तानला पहिली फलंदाजी दिली.

गुलबदिन नैबने तिसऱ्या क्रमांकावर येऊन चांगली फटकेबाजी केल्यामुळे अफगाणिस्तानचा (Ind vs Afg 2nd T20) संघ मोठी मजल मारेल अशी शक्यताही निर्माण झाली. नैबने ३५ चेंडूंत ५३ धावा करताना ४ षटकारही लगावले. नजिबुल्ला झदरान (२३), करिम जनत (२०) आणि मुजिबूर रहमान (२१) यांनीही छोट्या पण, उपयुक्त खेळी रचल्या. पण, २० षटकांनंतर अफगाण संघ सर्वबाद १७२ धावाच करू शकला.

(हेही वाचा – एकाच वेळी फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये चमत्कार करणारे Chuni Goswami)

कारण, अर्शदीप, अक्षर रवी बिश्नोई यांनी वेळोवेळी (Ind vs Afg 2nd T20) टिपलेले बळी. या तिघांनी अफगाणिस्तान संघाला दोनशेच्या आत रोखलं. आणि त्यानंतर यशस्वी जयसवाल आणि शुभम दुबे यांनी षटकामागे अकरा धावांची गती राखत फटकेबाजी केली आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

यशस्वी जयसवाल पहिला टी-२० सामना (Ind vs Afg 2nd T20) दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण, दुसऱ्या सामन्यात त्याने सुरुवातच चौकाराने केली. आणि ३४ चेंडूंत ६८ धावा त्याने केल्या त्या ६ षटकारांसह. शिवम दुबेही ३२ चेंडूत ६३ धावा करत नाबाद राहिला. १३ महिन्यांनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणारा विराट २९ धावांवर बाद झाला.

(हेही वाचा – Padmaja Fenani: गायिका पद्मजा फेणाणी – जोगळेकर यांना ‘एकता कला गौरव’ पुरस्कार प्रदान)

यशस्वी आणि शिवम दुबेमुळे (Ind vs Afg 2nd T20) भारतीय संघ अक्षरश: सोळाव्या षटकांतच हा सामना जिंकला. पण, विजयाचं श्रेय दिलं पाहिजे ते गोलंदाजांना. आणि त्यातही अक्षर पटेलला. चेंडूच्या वेगात बदल करत पण, अचूकता साधत त्याने गोलंदाजी केली. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

४ षटकांत फक्त १७ धावा देत त्याने इब्राहिम झदरान आणि जम बसलेला गुलबदिन नैब यांना बाद केलं. अर्शदीप सिंगनेही ३२ धावांत ३ गडी टिपले. या विजयासह भारतीय संघाने मालिकाही २-० फरकाने जिंकली आहे. आतापर्यंत भारतासाठी या मालिकेत सगळं मनासारखं घडलं आहे. फक्त कर्णधार रोहीत शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. (Ind vs Afg 2nd T20)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.