Iceland Cricket Bids For CT 2025 : आईसलँड क्रिकेटची चॅम्पियन्स करंडक आयोजनाची तयारी, बोर्डाची विनोदी पोस्ट व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकाचं यजमापद जाण्याचीच चिन्ह आहेत. अशावेळी आईसलँड क्रिकेटने आयोजनाची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी केलेली विनोदी पोस्ट व्हायरल झाली आहे. 

75

  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकाचं यजमापद जाण्याचीच चिन्ह आहेत. अशावेळी आईसलँड क्रिकेटने आयोजनाची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी केलेली विनोदी पोस्ट व्हायरल झाली आहे.

पाकिस्तानमध्ये २०२५ ची चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. पण, भारतीय संघ पाकला जाण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय इतरही काही देश सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानमध्ये जायला विरोध करू शकतात. हे लक्षात घेऊन आता आयसीसीमध्ये दुसरीच चर्चा रंगू लागली आहे. यजमानपद पाककडून काढून घेऊन ते दुबई किंवा इतर कुठल्यातरी देशाला द्यावं अशा चर्चांना बळ मिळत आहे.

अशावेळी पाक क्रिकेटला सोशल मीडियावर वेळोवेळी डिवचणाऱ्या आईसलँड क्रिकेटने आताही एक खोचक सोशल मीडिया पोस्ट टाकली आहे. त्यांनी या पोस्टमधून चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दाखवली आहे. आणि त्याचवेळी एका मोठ्या पत्रात आईसलँडमधील भौगोलिक परिस्थितीचं वर्णन केलं आहे.

‘आम्ही मागे हटणारे लोक नाही. त्यामुळे आज अधिकृतपणे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी आम्ही अर्ज करत आहोत आणि आयसीसीचे ग्रेग बार्क्ले यांच्याकडून आम्हाला उत्तराची अपेक्षा आहे,’ असं क्रिकेट आईसलँडच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पण, यानंतरच्या अख्ख्या पत्रात त्यांनी आईसलँडमधील भौगोलिक परिस्थितीचं वर्णन केलं आहे. तिथला डोंगराळ भूभाग आणि बारा महिने पडणारं बर्फ अशा परिस्थितीतही आपण आयोजनाला तयार आहोत, अशी त्यांची भूमिका आहे. अर्थात, या पोस्टमध्ये खोचकपणाच जास्त आहे.

(हेही वाचा – Milk Rates : शरद पवारांचे खुले पत्र; दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन…)

यापूर्वीही पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला क्रिकेट आईसलँडने एका ट्विटर पोस्टवर डिवचलं होतं. कोव्हिड उद्रेकानंतर कुठली गोष्ट अजून पूर्ववत झालेली नाही? असा प्रश्न स्वत:च विचारत, क्रिकेट आईसलँडने उत्तर दिलं होतं, ‘पाक कर्णधार बाबर आझमची फलंदाजीची सरासरी. ती अजून ४० च्या आतच आहे.’

बाबर आझम विश्वचषक स्पर्धेदरम्यानही फॉर्मशी झगडत होता आणि ९ सामन्यांत त्याने ३२० धावा केल्या त्या ३८ च्या सरासरीने. त्यामुळे बाबर आझमची खिल्ली उडवण्याचाच क्रिकेट आईसलँडचा हा प्रयत्न होता. त्यानंतर आता त्यांनी यजमानपद भूषवणं तिथलं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती यामुळे अशक्य असतानाही पाकला चॅम्पियन्स करंडकावरून डिवचलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.