ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमरा आणि विराट कोहलीची आगेकूच

रोहीत शर्माही पहिल्यांदाच यावर्षी पहिल्या दहांत पोहोचला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत पहिल्या दहांत विराट कोहली, रोहीत शर्मा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमरा हे भारतीय क्रिकेटपटू आहेत.

167
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमरा आणि विराट कोहलीची आगेकूच

ऋजुता लुकतुके

मागच्या आठवड्यात भारत वि. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान अशा दोन कसोटी मालिका झाल्या. या दोनही मालिकांमधील प्रत्येक कसोटी निकाली निघाल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) अनेक बदल झाले आहेत.

जसप्रीत बुमरा ७८७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर –

गोलंदाजांमध्ये भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमरा ७८७ गुणांसह रवी जाडेजाला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर (ICC Test Ranking) पोहोचला आहे. तर बुमराचा साथीदार मोहम्मद सिराजही १३ पायऱ्या वर चढून आपल्या सर्वोत्तम १७ व्या स्थानावर (ICC Test Ranking) पोहोचला आहे. त्याचे ६६१ गुण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत त्याने दोन्ही डावात मिळून ७ बळी टिपले होते.

(हेही वाचा – India T20 Team : इशान, श्रेयसला का वगळलं? द्रविड यांनी सांगितलं ‘खरं’ कारण)

पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज –

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ३-० असा निर्णायक विजय मिळवला. (ICC Test Ranking) या विजयात मोलाची भूमिका बजावणारा कर्णधार पॅट कमिन्स आता कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे.

(हेही वाचा – Ram Mandir: राम लल्ला मंदिर परिसरात यजुर्वेद पठणाला सुरुवात, १२१ वेदपतींना आमंत्रण)

विराट कोहली सहाव्या स्थानावर –

फलंदाजांमध्ये न्यूझीलंड कर्णधार (ICC Test Ranking) केन विल्यमसन, इंग्लंडचा जो रुट आणि ऑस्ट्रेलियन स्टिव्ह स्मिथ यांनी क्रमवारीतील पहिल्या तीन जागा यावर्षी सोडलेल्या नाहीत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशेनने मात्र आता चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराटने १७८ धावा केल्या होत्या.

(हेही वाचा – Liquor Policy Scam Case : खासदार संजय सिंह आणि सिसोदियांच्या कोठडीत वाढ)

रोहीत शर्माही पहिल्या दहांत पोहोचला –

तर रोहीत शर्माही पहिल्यांदाच यावर्षी पहिल्या दहांत (ICC Test Ranking) पोहोचला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत पहिल्या दहांत विराट कोहली, रोहीत शर्मा, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमरा हे भारतीय क्रिकेटपटू आहेत. (ICC Test Ranking)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.