ICC Rankings ODI : आयसीसी क्रमवारी जाहीर; कोणता खेळाडू कोणत्या स्थानावर

शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या, विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.

211
ICC Rankings ODI : आयसीसी क्रमवारी जाहीर; कोणता खेळाडू कोणत्या स्थानावर
ICC Rankings ODI : आयसीसी क्रमवारी जाहीर; कोणता खेळाडू कोणत्या स्थानावर

बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी आयसीसीची (ICC Rankings ODI) ताजी क्रमवारी जाहीर झाली आहे. ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-4 मध्ये समावेश आहे. यामध्ये भारतीय संघाचा सुप्रसिद्ध फलंदाज विराट कोहली आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या, विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.

(हेही वाचा – Prasad Kulkarni : कोरोनाकाळात अनेकांचे प्राण वाचवणारे सामाजिक कार्यकर्ते ‘प्रसादिती इक्विपमेंटस्’चे प्रसाद कुलकर्णी यांचे निधन)

बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-४ मध्ये समावेश आहे. शुभमन गिल पहिल्या, विराट कोहली तिसऱ्या, तर कर्णधार रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या बाबर आझमने दुसऱ्या स्थानावर आपले स्थान कायम ठेवले आहे. गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराजने अव्वल स्थानावर आपले नाव कोरले आहे तर, भारताचा मोहम्मद सिराज तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. (ICC Rankings ODI)

अवल्ल १० मध्ये ४ भारतीय गोलंदाज

भारतीय संघाचा मोहम्मद शमी गोलंदाजी क्रमवारीत टॉप-१० मध्ये आला असून तो दहाव्या क्रमांकावर आहे. शमी, सिराजसह जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आणि कुलदीप यादवने सहाव्या क्रमांकावर मजल मारली आहे. कुलदीप पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर घसरला आहे, ज्याचे रेटींग (६६७) अफगाणिस्तानच्या रशिद खान बरोबरीचे आहे. (ICC Rankings ODI)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ‘त्या’ फोटोवर अखेर चंद्रशेखर बावनकुळे बोललेच; म्हणाले…)

फलंदाजीत भारताचा शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो 7 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर गेला आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला एका स्थानाचा फटका बसला आहे.

बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. टॉप-10 मध्ये जडेजा एकमेव भारतीय आहे. तो आता 9व्या वरून 10व्या स्थानावर गेला आहे. (ICC Rankings ODI)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.