HL : World Archery Championship 2023 : भारतीय महिलांना कम्पाऊंड प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण

SUMMARY : World Archery Championship : बर्लिन इथं सुरू असलेल्या तिरंदाजीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सुवर्ण पदक जिंकलं आहे. सांघिक कम्पाऊंड प्रकारात महिला संधाने ही कामगिरी केली.

86

भारतीय महिला तिरंदाजी (India’s Women’s Archery Team) संघाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Archery Championships 2023) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्योती सुरेखा वेन्नम (Surekha Vennam), अदिती स्वामी (Aditi Swami) आणि परनीत कौर (Parneet Kaur) यांच्या चमूनं कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. या प्रकारात भारतीय महिलांना मिळालेलं हे पहिलं वहिलं सुवर्ण आहे.

भारतीय संघाची अंतिम फेरीत गाठ होती मेक्सिकोच्या अनुभवी संघाशी. पण, मेक्सिकोला त्यांनी 235 विरुद्ध 229 गुणांनी मात दिली. अंतिम फेरीपर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघाचं सगळीकडे कौतुक होत आहे.

भारतीय महिलांनी स्पर्धेत तगडी कामगिरी करताना कोलंबिया आणि चायनीज तैपेई या बलाढ्य संघांचा पराभव केला. विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने 9 रौप्य तसंच 2 कांस्य पदकं जिंकली होती. पण, यंदा प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यात महिला संघ यशस्वी झाला.

(हेही वाचा Cancer : वीर सावरकरांच्या उच्च विचारांचा आधार घेवून मी कर्करोगावर मात केली – शरद पोंक्षे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.