BCCI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये ‘हा’ खेळाडू होणार कर्णधार; बीसीसीआयने केले जाहीर

127

५ जुलै रोजी बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘वर्ल्ड टेस्ट’ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय कसोटी संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांचा संघात समावेश होता.

हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांची बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच ही घोषणा झाली. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या दुखापतीमुळे संजू सॅमसनलाही संघात संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांचीही निवड झाली आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माला संघात स्थान मिळाले नाही. यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा आणि मुकेश कुमार या नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय रवी बिश्नोई आणि आवेश खान यांचेही संघात पुनरागमन झाले आहे.

(हेही वाचा एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांकडे दिली पाच आमदारांची जबाबदारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.