एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांकडे दिली पाच आमदारांची जबाबदारी

154
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांकडे दिली पाच आमदारांची जबाबदारी

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी रणनीती आखली असून, आपल्या पक्षातील मंत्र्यांकडे पाच आमदारांची जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या सत्तासहभागामुळे शिवसेनेच्या वाट्याची मंत्रीपदे आणि महामंडळांची संख्या कमी झाली आहे. माध्यमांमध्ये सातत्याने तशा बातम्या येत असल्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर आमदार, खासदारांची बैठक घेतली.

(हेही वाचा – रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट)

राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळात आल्याने अस्वस्थ होण्याचे कारण नाही. तुमची कोणतीही कामे अडणार नाहीत. मी मुख्यमंत्री आहे. शेवटी सगळ्या फायली माझ्याकडेच येणार आहेत. त्यामुळे तुमच्या मतदारसंघांना कोणताच धोका मी पोहोचू देणार नाही, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना आश्वस्त केले.

शिवाय, प्रत्येक पाच आमदारांमागे एका मंत्र्यांची नियुक्ती केली. संबंधित आमदारांच्या मतदारसंघातील प्रत्येक कामाचा पाठपुरावा हे मंत्री करतील. त्यांना निधी मिळवून देण्याची जबाबदारीही या मंत्र्यांची असेल. या माध्यमातून शिंदे यांनी नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.