Hardik Pandya Net Worth : मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याची किती आहे संपत्ती ?

Hardik Pandya Net Worth : भारतीय संघाचा भावी टी-२० कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जातं 

14637
Hardik Pandya Net Worth : मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याची किती आहे संपत्ती ?
Hardik Pandya Net Worth : मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याची किती आहे संपत्ती ?
  •  ऋजुता लुकतुके

२०१५ चं आयपीएल हार्दिक पांड्याने (Hardik Pandya Net Worth) गाजवलं. भारतीय संघात असलेली अष्टपैलू तेज गोलंदाजाची पोकळीही तो भरून काढेल असा विश्वास निवड समितीला वाटायला लागला. त्यामुळे भारतीय संघात त्याचा समावेश अगदी सोपा झाला. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हार्दिकने टी-२० संघाचा कर्णधार होण्यापर्यंत मजल मारली आहे. सध्या मुंबई इंडियन्स संघात कर्णधार म्हणून ट्रोल होत असला तरी संघ प्रशासनाने त्याच्यावर विश्वास दाखवलाय तो गेल्या ९ वर्षांच्या कामगिरीमुळे. (Hardik Pandya Net Worth)

(हेही वाचा- CM Eknath Shinde: “सुरतला निघालो अन् उद्धव ठाकरेंचा फोन…” एकनाथ शिंदेनी केली पोलखोल)

क्रिकेटमधील यशाबरोबरच प्रायोजकत्वाचे करार आणि इतर माध्यमातूनही हार्दिकची प्रगतीच होत राहिली. आज तो बडोदा आणि मुंबईत वास्तव्याला आहे. हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया. (Hardik Pandya Net Worth)

  • स्पोर्ट्स कीडा या वेबसाईटने हार्दिक पांड्याची एकूण मालमत्ता मार्च २०२४ पर्यंत ९१ कोटी रुपये असल्याचं म्हटलंय. त्याचे मिळकतीचे स्त्रोत प्रामुख्याने क्रिकेट आणि जाहिराती हेच आहेत. बीसीसीआयबरोबरचा त्याचा मध्यवर्ती करार हा ५ कोटी रुपयांचा आहे. महिन्याला त्याला सरासरी १.२ कोटी रुपये मिळतात. (Hardik Pandya Net Worth)

(हेही वाचा- NIA: टेरर फंडिंगप्रकरणी श्रीनगरमध्ये ९ ठिकाणी छापे, अधिकाऱ्यांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात)

  • २०२२ मध्ये गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्याला १५ कोटी रुपये मोजून खरेदी केलं होतं. तर २०२४ मध्ये तेवढेच पैसे मोजून मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात शामील करून घेतलं. गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिल्यानंतर हार्दिकची जाहिरातीतील ब्रँड मूल्य ३० ते ४० टक्क्यांनी वाढलं. विवियन, रिलायन्स रिटेल यासारखे ब्रँड त्याच्याकडे आहेत. (Hardik Pandya Net Worth)

  • आरटू, लेंडेनक्लब या सारख्या स्टार्टअपमध्ये हार्दिक पांड्याने गुंतवणूक केली आहे. (Hardik Pandya Net Worth)

  • हार्दिक पांड्याचं गुजरातमध्ये वडोदरा इथं मोठं पेंटहाऊस आहे. तिथे तो आपल्या कुटुंबासह राहतो. याशिवाय काही वर्षांपूर्वी मुंबईतही त्याने ३० कोटी रुपये मोजून एक घर खरेदी केलं आहे. (Hardik Pandya Net Worth)

  • हार्दिकला गाड्यांचं वेड आहे. त्याची सगळ्यात महागडी गाडी आहे ती लँबॉर्गिनी. शिवाय त्याच्याकडे ऑडी ६, हुराकन ईव्हीओ या गाड्याही आहेत. (Hardik Pandya Net Worth)

  • कोव्हिड १९ च्या काळात हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्याने केलेला दानधर्म लक्षात राहणारा होता. त्याने गरजू लोकांना ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर्स आणि इतर साधनं, औषधं मोफत वाटली होती.  (Hardik Pandya Net Worth)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.