Eng vs WI : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीत गस ॲटकिन्सनचे ४ चेंडूंत ३ बळी

Eng vs WI : इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवशी विंडिज डाव १२१ धावांत संपवला 

98
Eng vs WI : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीत गस ॲटकिन्सनचे ४ चेंडूंत ३ बळी
Eng vs WI : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीत गस ॲटकिन्सनचे ४ चेंडूंत ३ बळी
  • ऋजुता लुकतुके 

इंग्लिश तेज गोलंदाज जेम्स अँडरसनच्या (James Anderson) समारोपाच्या कसोटीत पहिला दिवस गाजवला तो इंग्लिश संघात पदार्पण करणाऱ्या गस ॲटकिन्सनने (Gus Atkinson). पहिल्या डावात ७ बळी तर त्याने घेतलेच. पण, यातले ३ बळी त्याने एकाच षटकात ४ चेंडूंमध्ये घेतले. तिथेच विंडिजचा पहिला डाव झटपट गुंडाळला जाणार हे स्पष्ट झालं. विंडिज संघ तेव्हा ३५ षटकांत ३ बाद ८५ अशा स्थितीत होता. डाव सावरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अशावेळी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) ॲटकिन्सनला पुन्हा गोलंदाजीला आणलं. (Eng vs WI)

(हेही वाचा- Shivani Raja : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीने गीता घेत घेतली खासदारकीची शपथ)

या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ॲटकिन्सनने (Gus Atkinson) एलिक एथनाज़ला (Alick Athanaze) २३ धावांवर बाद केलं. स्लिपमध्ये जो रुटने त्याचा झेल पकडला. पुढच्याच चेंडूवर जेसन होल्डरही अशाच पद्धतीने बाद झाला. दी सिल्वाने पुढच्या चेंडूवर हॅट – ट्रीक तर टाळली. पण, आणखी एकाच चेंडूत तो यष्टीरक्षक जेमी स्मिथकडे (Jamie Smith) झेल देऊन बाद झाला.  (Eng vs WI)

 पहिल्या डावात ॲटकिन्सनने ४५ धावांत ७ बळी मिळवले. याच कसोटीत २० वर्षं इंग्लिश क्रिकेटची सेवा केलेला जेम्स अँडरसन (James Anderson) ४१ व्या वर्षी निवृत्त होत आहे. आणि इंग्लिश संघ नवीन तेज गोलंदाजाच्या शोधात असताना ॲटकिन्सनने आपली चुणूक निवड समितीला दाखवून दिली आहे. २६ वर्षीय ॲटकिन्सन सरे काऊंटीकडून खेळतो. २०२२ च्या हंगामात सरेकडून तो फक्त ४ सामने खेळू शकला. पण, स्विंग गोलंदाजीची चुणूक तेव्हाही त्याने दाखवून दिली होती. त्याच्या जोरावर २०२३ च्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याची निवड झाली. याच मालिकते तो टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळला. कसोटीतील पदार्पणासाठी त्याला आणखी एक वर्ष वाट पहावी लागली. (Eng vs WI)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.