Eden Garden Wall Collapsed : ईडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली ,बीसीसीआयची डोकेदुखी वाढली

68
Eden Garden Wall Collapsed : ईडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली ,बीसीसीआयची डोकेदुखी वाढली
Eden Garden Wall Collapsed : ईडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली ,बीसीसीआयची डोकेदुखी वाढली

भारतामध्ये सध्या वर्ल्डकप २०२३ सामने चांगलेच रंगत आहे. मात्र हे सामने सुरु असतानाच नेमके कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर मोठी दुर्घटना घडली. या मैदानाच्या भिंतीला अर्थ मुव्हिंग मशिनची धडक लागल्याने स्टेडियमच्या बाहेरील बाजूला असलेल्या भिंतीचा काही भाग तुटून पडला आहे. (Eden Garden Wall Collapsed)

याच मैदानावर २८ ऑक्टोबर (शनिवार) रोजी याच मैदानावर नेदरलँड आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भिंतीचा काही भाग तुटून पडला आहे. जो भाग तुटून पडला आहे, तो ३ आणि ४ नंबर गेटच्या मधला भाग आहे. तर मंगळवारी इडन गार्डनवर पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. ५ नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महत्वाचा सामना इडन गार्डनवरच होणार आहे. तर ११ नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. याचबरोबर १६ नोव्हेंबरला वर्ल्डकपमधील सेमी फायनल सामना खेळवण्यात येणार आहे.

(हेही वाचा : IMC : पूर्वीचं सरकार तेव्हाच्या मोबाईलसारखंच हँग होतं होते ; पंतप्रधान मोदींचा UPA ला टोला)

ही पडलेली भिंत १८६४ साली बांधण्यात आली होती. इडन गार्डन हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. भारतातील हे सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम असून त्याची आसन क्षमता ही ६६,००० इतकी आहे. आयपीएलचा संघ केकेआरचे हे होम ग्राऊंड असून क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडे या स्टेडियमची मालकी आहे.क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने सांगितले की पुनर्वसनाचे काम सुरू असताना ही घटना घडली. पडलेली भिंत दुरूस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.