Dynamic Kho Kho League : मुंबईतील डायनॅमिक खो खो लीग स्पर्धेत माहिम वॉरिअर्स विजेते

मुंबई विभागात झालेल्या लीग स्पर्धेत माहिम वॉरिअर्सचा रोहन टेमकर सर्वोत्तम ठरला. 

154
Dynamic Kho Kho League : मुंबईतील डायनॅमिक खो खो लीग स्पर्धेत माहिम वॉरिअर्स विजेते
  • ऋजुता लुकतुके

मुंबई विभागीय खो खो स्पर्घेत अमरहिंद मंडळाच्या डायनॅमिक खो खो लीगला (Dynamic Kho Kho League) एक वेगळं महत्त्व आहे. मध्य मुंबईतील संघ या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा या स्पर्धेवर माहिम वॉरिअर्स संघाचंच वर्चस्व होतं. साखळीतील सर्व सामने जिंकून त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला होता. आणि अंतिम स्पर्धेतही परेल रुद्राज् संघाचा त्यांनी २०-१९ असा पराभव केला. (Dynamic Kho Kho League)

दादरच्या अमरवाडी मैदानावर, गोखले रोड येथे संपन्न झालेल्या डायनॅमिक खो खो लीग (Dynamic Kho Kho League) स्पर्धेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून ओमकार मिरागळ (माहीम वॉरियर्स), सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून करण गारोळे (परेल रुद्राज) व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. (Dynamic Kho Kho League)

अंतिम सामन्यात माहीम वॉरियर्सने आपली स्पर्धेतील विजयी मालिका कायम ठेवत परेल रुद्राजला २०-१९ (मध्यंतर ९-१०) चुरशीच्या सामन्यात एक गुणाने विजय हासील करत अमरहिंद मंडळाच्या डायनॅमिक खो खो लीग (Dynamic Kho Kho League) चषकावर नाव कोरले. पहिल्या डावात परेल रुद्राजने १ गुणाची आघाडी घेतली होती मात्र त्यांना ती आघाडी विजयात परिवर्तीत करता आली नाही. मध्यंतरा नंतर चौथ्या टर्न मध्ये माहीम वॉरियर्सने १४-१३ अशी एक गुणाची आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवून ठेवून विजयी जल्लोष केला.(Dynamic Kho Kho League)

(हेही वाचा – BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच)

यांनी केली दमदार कामगिरी 

या सामन्यात माहीम वॉरियर्सच्या रोहन टेमकर (२.३०, नाबाद २.१० मि. संरक्षण व १ गुण), जनार्दन सावंत (२.१० मि. संरक्षण व १ गुण), ओमकार मिरागळ (६ गुण), आयुष गुरव (१, १.१० मि. संरक्षण) व ओम भरणकर (२ गुण) यांनी तर परेल रुद्राजच्या करण गारोळे (२,१०, १.५० मि. संरक्षण), पियुष घोलम (१.५० मि. संरक्षण व ३ गुण), रोहित परब (६ गुण) व हितेश आग्रे (४ गुण) यांनी केलेली दमदार कामगिरी या सामन्यात प्रेक्षकांना शेवट पर्यंत खिळवून ठेवण्यास कारणीभूत ठरली. (Dynamic Kho Kho League)

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात वरळी फिनिशर्सने साखळीतील पराभवाचा वचपा काढत दादर पँथर्सचा १३-३ असा १० गुणांनी पराभव केला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मंडळाचे विश्वस्त अरुण देशपांडे, विश्वस्त दीपक पडते, प्र. कार्यवाह रवींद्र ढेवळे, कोषाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सहकार्यवाह जतीन टाकळे, स्पर्धा संयोजक निलेश सावंत, क्षितीज वेदक आदी उपस्थित होते. (Dynamic Kho Kho League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.