BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच

महापालिकेच्यावतीने मुंबईत पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांचा एकूण खर्च आता १ लाख ९९ हजार २८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका बाजुला पायाभूत प्रकल्पांचा एकूण खर्चाने दोन लाख कोटींची मजल मारलेली असतानाच दुसरीकडे या प्रकल्पांचा खर्च भागवण्यासाठी महापालिकेच्या हाती केवळ सुमारे ४६ हजार कोटी रुपय एवढाच निधी आहे.

734
BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच
BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच
  • सचिन धानजी,मुंबई

महापालिकेच्यावतीने (BMC Project Cost) मुंबईत पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांचा एकूण खर्च आता १ लाख ९९ हजार २८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका बाजुला पायाभूत प्रकल्पांचा एकूण खर्चाने दोन लाख कोटींची मजल मारलेली असतानाच दुसरीकडे या प्रकल्पांचा खर्च भागवण्यासाठी महापालिकेच्या (BMC Project Cost) हाती केवळ सुमारे ४६ हजार कोटी रुपय एवढाच निधी आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न कमी होत असताना या दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीड लाख कोटी रुपये कुठून आणले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC Project Cost)

महसुलात सुमारे पाच हजार कोटींची घट

मुंबई महापालिकेचा (BMC Project Cost) सन २०२४-२५ चा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये महापालिकेचे महसुली उत्पन्न हे २९ हजार ४३१ कोटी रुपये एवढे दर्शवले आहे. तर महापालिकेचा चालू आर्थिक वर्षांत ३४ हजार ४५१ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत उर्वरीत महसूल प्राप्त होईल. परंतु महापालिकेचे महसुली उत्पन्न हे ३४ हजार कोटींच्या तुलनेत वाढणे अपेक्षित असताना आगामी आर्थिक वर्षांसाठी २९ हजार ४३१ कोटी रुपये दर्शवल्याने तब्बल महसुलात सुमारे पाच हजार कोटींची घट दिसून येत आहे. (BMC Project Cost)

दीड लाख कोटींचा निधी आणणार कुठून?

मुंबई महापालिकेने (BMC Project Cost) चालू आर्थिक वर्षांत १ लाख २४ हजार १२९ कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहे. त्यासाठी महापालिकेने १९ हजार ७६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु आगामी वर्षांत या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एकूण खर्च ७३ ते ७४ हजार कोटींनी वाढला गेला. एकूण ४१ प्रकल्पांसाठी एकूण १ लाख ९९ हजार २८३ कोटी रुपयांचा अपेक्षित मानला आहे. मात्र, या सर्व प्रकल्पांचा खर्च पेलण्यासाठी महापालिकेच्या (BMC Project Cost) हाती केवळ ४५ हजार ७५९ कोटी रुपयेच आहेत. मग एका बाजुला महसुलात होणारी घट आणि सुमारे दोन लाख कोटींचे हाती घेण्यात येणारे प्रकल्प तसेच हाती असलेला निधी लक्षात महापालिका दीड लाख कोटींचा निधी कुठून आणि कसा जमा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC Project Cost)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या द्विशतकानंतर यशस्वी सचिन, विनोद आणि रवी शास्त्रीच्या पंक्तीत)

विशेष उद्दिष्टांकरता ३९,०६४ कोटींचा राखीव निधी

मुंबई महापालिकेकडे (BMC Project Cost) ४५, ७५९.२१ कोटींचा राखीव निधी आहे, जो प्रकल्पांसाठी वापरला जाऊ शकतो, तर विशेष उद्दिष्टांकरता राखीव ठेवलेला निधी हा ३९,०६४ कोटी रुपये एवढा आहे, जो महापालिका खर्च करू शकत नाही. या विशेष उद्दिष्टांकरता राखीव ठेवलेला निधी हा भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन निधी, निवृत्ती वेतनासंदर्भातील मुदतठेवी, कंत्राटदारांकडून स्वीकारलेल्या अनामत व इतर प्रकारची ठेव रक्कम तसेच चर खणण्यासाठी ठेवलेली रक्कम व अनुदान अशा स्वरुपाची आहे. त्यामुळे महापालिकेला (BMC Project Cost) केवळ ४५ हजार ७५१ कोटी रुपये वापरले जाऊ शकतात. (BMC Project Cost)

अशाप्रकारे प्रकल्पांचा वाढला खर्च

महापालिकेच्यावतीने चालू आर्थिक वर्षांत हाती घेण्यात येणाऱ्या पायाभूत प्रकल्पांच्या तुलनेत आगामी वर्षांत यासाठीचा खर्च सुमारे ७३ ते ७४ हजार कोटींनी वाढले. यामध्ये सात सांडपाणी प्रकल्पाचा जो शिल्लक खर्च २७,३०९ कोटी रुपये होता, तो आता ३१, ८३८ कोटी रुपये एवढा झाला आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा खर्च १० हजार कोटींवरुन शिल्लक खर्च १४,८७४ कोटींवर पोहोचला आहे. भांडुप जलशुध्दीकरण केंद्र कता ५३०० कोटी रुपयांच्या तुलनेत सहा हजार कोटी रुपये दहिसर ते मिरारोड प्रकल्पाचा शिल्लक खर्च ३५५० कोटींवरुन ३९१० कोटी रुपये आणि वर्सोवा ते दहिसर या मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्पाचा खर्च ३४, ६३० कोटी रुपये, जलवहन बोगदे २६१२ कोटी रुपयांवरून ४७४० कोटी रुपये एवढी रक्कम वाढलेली आहे तसेच जलवहन बोगदा येवई ते कशेळी ६ हजार कोटी रुपये, पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र याकरता २५०० कोटी रुपये आणि पिसे येथे पंपिंग स्टेशन याकरता २०० कोटी रुपये आदी नवीन प्रकल्पांचा सामावेश आहे. (BMC Project Cost)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.