Divya Deshmukh : भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुख प्रेक्षकांवर का चिडली?

216
Divya Deshmukh : भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुख प्रेक्षकांवर का चिडली?
Divya Deshmukh : भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुख प्रेक्षकांवर का चिडली?
  •  ऋजुता लुकतुके

नेदरलँड्समध्ये विक ॲन झी इथं झालेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत प्रेक्षकांकडून आपल्याला एक महिला म्हणून हीन वागणूक मिळाल्याची तक्रार भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) केली आहे. तिने आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे. दिव्या नागपूरला राहते. आणि ती १८ वर्षीय उगवती बुद्धिबळपटू आहे. गेल्याचवर्षी तिने आशियाई मास्टर्स स्पर्धा जिंकली होती.

‘पुरुष खेळाडूंची एकमेकांशी तुलना किंवा त्यांच्याविषयी बोलताना लोक फक्त त्यांच्या खेळाचं विश्लेषण करतात. पण, समोर महिला खेळाडू असेल तर तिचे कपडे, बोलणं, केस अशा गोष्टींचीच जास्त चर्चा होते आणि हे वागणं आपल्या सेक्सिस्ट वाटतं. असे अनुभव क्षणोक्षणी येतात,’ असं दिव्याने (Divya Deshmukh)  पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Deshmukh (@divyachess)


(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाचं नवीन घर बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत)

‘मुलाखतींमध्ये मला खेळाविषयी प्रश्न विचारले जात नव्हते. तेच मी पुरुष खेळाडूची मुलाखत पाहिली तर तिथे फक्त खेळावर बोललं जात होतं. मला प्रेक्षकांना माझे केस, पेहराव आणि बोलण्याचा लहेजा यावर काय वाटतं ते सांगितलं जात होतं. महिला खेळाडूसाठी हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं,’ असं तिने आपल्या मोठ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

टाटा मास्टर्स स्पर्धेत ४.५ गुणांसह ती बारावी आली. पण, स्पर्धेनंतर तिच्या सोशल मीडिया पोस्टची मात्र चांगलीच चर्चा होत आहे. आणि तिला विविध क्षेत्रातून मान्यवरांचा पाठिंबाही मिळतोय.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.