Cricket Jersey Design : क्रिकेट जर्सीतील कुठल्या गोष्टी जर्सीला विजेत्याचा लुक देतात?

Cricket Jersey Design : क्रिकेटमधील पांढरी शुभ्र जर्सी ते रंगीबेरंगी जर्सीचा प्रवास

60
Cricket Jersey Design : क्रिकेट जर्सीतील कुठल्या गोष्टी जर्सीला विजेत्याचा लुक देतात?
Cricket Jersey Design : क्रिकेट जर्सीतील कुठल्या गोष्टी जर्सीला विजेत्याचा लुक देतात?
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांकडून आपल्याकडे आला. त्यामुळे क्रिकेटशी संबंधित सगळ्या गोष्टी आणि नियमही आपण त्यांच्याकडूनच उचलले. उदाहरणार्थ इंग्लिश लोकांना ( खेळ मातीतील असला तरी) पांढऱ्या शुभ्र रंगाचं वेड. त्यामुळे तिथली जगप्रसिद्ध विम्बल्डन स्पर्धाही हिरवळीवर होत असली आणि त्यात पडझड होऊन खेळाडू चिखलाने जरी माखले तरी त्यांची जर्सी ही पांढऱी शुभ्रच असणार हा स्पर्धेचा लौकिक. तसंच क्रिकेट व्हाईट्सचंही आहे. ब्रिटिशांनीच सुरुवातीला पायंडा पाडला की, क्रिकेटपटूंचे सदरे आणि विजार ही पांढऱी शुभ्र असणार. त्यावर कुठल्याही संघाचा लोगो असणं हे सुद्धा डाग पडल्यासारखं निषिद्ध होतं. (Cricket Jersey Design)

(हेही वाचा- Ajit Pawar: राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !)

१९८३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाने जिंकला तेव्हाही भारतीय संघाची जर्सी पांढरीच होती. पण, या कालावधीत क्रिकेटमध्ये बदल सुरू झालेले होते. १९७८ मध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान पहिली अनधिकृत रात्र – दिवस रंगलेली एकदिवसीय मालिका खेळवली गेली. आणि संघांनी पहिल्यांदा यात रंगीबेरंगी पोषाख परिधान केला. तरी जर्सीवर लोगो नव्हतेच. (Cricket Jersey Design)

पण, या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियात (Australia) एकदिवसीय क्रिकेटचं मार्केटिंग बदललं. आणि खेळात बदल सुरू झाले. १९८७ च्या एकदिवसीय विश्वचषकात पुन्हा एकदा रंगीत पोषाख वापरण्यात आला. पण, खऱ्या अर्थाने जर्सी बदलल्या त्या १९९२ च्या विश्वचषकात. या जर्सींना एकसारखं डिझाईन होतं. फक्त प्रत्येक संघाचे रंग वेगळे होते. आणि त्यावर सघाचा लोगो, खेळाडूचं नाव असं सगळं छापलेलं होतं. रंगीत जर्सीची खरी सुरुवात १९९२च म्हणावी लागेल. (Cricket Jersey Design)

(हेही वाचा- Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या चैत्र नवरात्री आणि नववर्षाच्या शुभेच्छा; जनतेला संबोधित करत म्हणाले…)

डिसेंबर २००० पासून हा बदल सगळीकडे पोहोचला. म्हणजे एकदिवसीय सामन्यात रंगीत पोषाख आणि कसोटीत पांढरा पोषाख ही गोष्ट सगळ्यांनी स्वीकारली. (Cricket Jersey Design)

भारतीय संघाबद्दल बोलायचं झाल्यास १९८० च्या दशकात मध्यावर भारतीय क्रिकेटपटूंसाठी रंगीत जर्सी आली. पण, डिझाईन प्राथमिक होतं. तिच्यावर ना खेळाडूंचं नाव लिहिलेलं होतं ना देशाचं, संघाचं नाव. १९९२ च्या विश्वचषकात या गोष्टी पहिल्यांदा जर्सीवर आल्या. भारतीय संघाने रंग मात्र फिकट निळा आणि वर पिवळ्या रंगाचा पॅटर्न असा निवडला होता. हा निळा रंगही कालपरत्वे बदलत गेला. (Cricket Jersey Design)

(हेही वाचा- Weather Update: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज)

सध्याची भारतीय जर्सी ही आदिदास कंपनीने बनवलेली आहे. आणि जून २०२३ मध्ये टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटसाठी तीन वेगवेगळ्या जर्सी आदिदासने लाँच केल्या. (Cricket Jersey Design)

जर्सीच्या डिझाईनमध्ये त्यासाठी वापरलेलं कापड, कपड्यावरील पॅटर्न, ग्राफिक्स आणि स्टाईल या महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. आताच्या जर्सीचे डिझायनर आहेत अकीब वाणी. आणि त्यांनी जर्सीवर वाघाच्या पट्ट्यांचा पॅटर्न ठेवला आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे आणि वाघ हा शौर्याचं प्रतीक असल्यामुळे त्यांनी या पॅटर्नची निवड केली आहे. (Cricket Jersey Design)

(हेही वाचा- Antop Hill Firing : अँटॉप हिल गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला डोंबिवलीतून अटक)

आणि खेळाडूचं नाव आणि देश अगदी ठळकपणे दिसेल असा छापलेला आहे. कारण, चाहत्यांचं त्यांच्या देशाची जर्सी आणि आवडत्या क्रिकेटपटूशी विशेष नातं असतं. जर्सीच्या माध्यमातून ते संघाशी जोडले गेलेले असतात. त्यामुळे या गोष्टींना जर्सीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंग, पॅटर्न, ग्राफिक आणि खेळाडू तसंच संघाचं नाव आणि लोगो या गोष्टीच जर्सीला ‘विनिंग लुक’ देत असतात. (Cricket Jersey Design)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.