Weather Update: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

156
Meteorology Department: २४ तासांत मुंबई, ठाण्यात अवकाळी पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी? वाचा सविस्तर...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही मंगळवारी, (९ एप्रिल) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Update)

महाराष्ट्रातील अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यात हिंगोली, वर्धा, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही मंगळवारी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar: राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !)

विदर्भात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातही पावसाची शक्यता
पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये ९ एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.