Cooch Behar Record : युवा प्रखर चतुर्वेदीच्या विक्रमी ४०४ धावा

१९ वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत ४०० हून जास्त धावा करणारा प्रखर पहिला फलंदाज ठरला आहे. 

160
Cooch Behar Record : युवा प्रखर चतुर्वेदीच्या विक्रमी ४०४ धावा
Cooch Behar Record : युवा प्रखर चतुर्वेदीच्या विक्रमी ४०४ धावा
  • ऋजुता लुकतुके

कूचबिहार करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास लिहिला गेला आहे. कर्नाटक विरुद्ध मुंबई सामन्यात कर्नाटकचा सलामीवीर प्रखर चतुर्वेदीने (Prakhar Chaturvedi) ४०४ धावा करत जागतिक स्तरावर १० वर्षांखालील गटात अंतिम फेरीत ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा मान मिळवला आहे. या खेळीत त्याने ३ षटकार आणि तब्बल ४६ चौकार लगावले. (Cooch Behar Record)

शिवाय प्रखर (Prakhar Chaturvedi) नाबादही राहिला. त्याच्या या कामगिरीमुळे कर्नाटकने पहिल्या डावांत मुंबईसमोर ८९० धावांचा डोंगर रचला आहे. कूच बिहार करंडकात वैयक्तिक सर्वात जास्त धावा करण्याचा युवराज सिंगचा २५ वर्ष जुना विक्रम सोमवारी मोडीत निघाला. (Cooch Behar Record)

(हेही वाचा – Shreyas Iyer : टी-२० संघातून वगळल्यावर श्रेयस अय्यर काय म्हणतो? )

१६३ धावांची भागिदारी

युवराज सिंगने पुढे जाऊन राष्ट्रीय संघातही नेत्रदीपक यश मिळवलं. १९९९ मध्ये त्याने कूचबिहार करंडक स्पर्धेत बिहार विरुद्ध ३५८ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात बिहार संघातून महेंद्रसिंग धोनीही खेळला होता. तर कूच बिहार करंडक स्पर्धेत २०११-१२ च्या हंगामात विजय झोलने ४५१ धावा केल्या होत्या. (Cooch Behar Record)

कर्नाटकने मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. राहुल द्रविडचा मुलगा संमित द्रविडनेही बॅट तसंच बॉलने उपयुक्त योगदान दिलं. प्रखरच्या शतकाबरोबरच त्याचा सहकारी हर्षिल धरमानीची कामगिरीही उठून दिसली. त्याने १६९ धावा केल्या. तर दहाव्या क्रमांकावरील समर्थ एन नेही प्रखरच्या साथीने १६३ धावांची भागिदारी केली. आणि मुंबईच्या गोलंदाजांना रडवलं. (Cooch Behar Record)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.