Captain Rohit Sharma : टी-२० विश्वचषकात रोहितच कर्णधार, बीसीसीआय सचिवांची ग्वाही

टी-२० विश्वचषकात रोहित कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल असं जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे. 

120
Captain Rohit Sharma : टी-२० विश्वचषकात रोहितच कर्णधार, बीसीसीआय सचिवांची ग्वाही
Captain Rohit Sharma : टी-२० विश्वचषकात रोहितच कर्णधार, बीसीसीआय सचिवांची ग्वाही
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेटमधील एक मोठी घडामोड म्हणजे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतही रोहित शर्माच (Rohit Sharma) भारतीय संघाचा कर्णधार असेल आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राजकोट कसोटीच्या एक दिवस आधी जाहीर केलं आहे. या त्यांच्या घोषणेत बरेच अर्थ दडलेले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने अलीकडेच हार्दिकला गुजरात टायटन्स संघाकडून फक्त विकत घेतलं नाही तर रोहितला (Rohit Sharma) डावलून कर्णधार केलं. त्यानंतर भारतीय संघही तीच रणनीती आखतो का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण, राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाह यांनी थेट घोषणेनं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. (Captain Rohit Sharma)

‘आपण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला असला तरी लोकांची मनं जिंकली आहेत. सलग १० सामने भारतीय संघाने जिंकून दाखवले. आणि मला विश्वास आहे की, २०२४ चा टी-३० विश्वचषक आपण नक्की जिंकू. बार्बाडोसमध्ये रोहित शर्माच्या कप्तानीखाली भारतीय संघ ही कामगिरी नक्की करून दाखवेल,’ असं शाह म्हणाले. (Captain Rohit Sharma)

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : ध्रुव जुरेलचा पदार्पणापूर्वी भावूक संदेश)

हार्दिक उपकर्णधार – जय शाह

जय शाह यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा खुद्द रोहित शर्मा (Rohit Sharma), संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरही उपस्थित होते. शाह यांनी त्याच भाषणात बीसीसीआयची याविषयीची भूमिकाही मांडली. ‘रोहित एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करतच होता. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत तो टी-२० क्रिकेटमध्ये परतला. याचाच अर्थ तो नेतृत्व करणार असाच होता,’ असं जय शाह यांनी स्पष्ट केलं. (Captain Rohit Sharma)

तर हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार असेल असंही ते बोलण्याच्या ओघात म्हणाले. ‘अफगाणिस्तान विरुद्ध भारताची अवस्था ४ बाद २२ असताना रोहितने (Rohit Sharma) संघाला २२२ अशी धावसंख्या गाठून दिली. रोहितची ही क्षमता आहे. अशावेळी त्याच्यावर शंका कोण घेणार. तसंच हार्दिक दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. एरवी त्याच्याही संघातील जागेवर शंका घेण्याचं कारण नाही. त्यामुळे तोच उपकर्णधार असेल हे निश्चित आहे.’ (Captain Rohit Sharma)

मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्यावरही विश्वास दाखवला आहे. तर विराट कोहलीच्या टी-२० संघातील समावेशावर त्याच्याशी चर्चा करू असं ते म्हणाले. १५ वर्षांत पहिल्यांदा वैयक्तिक कारणांनी सुट्टी घेणाऱ्या विराट कोहलीला त्यांनी बीसीसीआयचा पाठिंबा जाहीर केला. (Captain Rohit Sharma)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.