Brazil Out of Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधून बलाढ्य ब्राझील आऊट

फुटबॉलमधील बलाढ्य संघ ब्राझीलला ऑलिम्पिकसाठी पात्रही होता आलं नाही. 

157
Brazil Out of Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधून बलाढ्य ब्राझील आऊट
  • ऋजुता लुकतुके

मागच्या दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक कमावलेला ब्राझीलचा संघ (Brazil team) यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता फेरीतच गारद झाला आहे. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाकडून त्यांचा ०-१ असा पराभव झाला आणि दक्षिण अमेरिका खंडातील पात्रता फेरीतून ब्राझीलचा संघ बाद झाला. २०१६ चं रिओ ऑलिम्पिक आणि त्यानंतरच्या टोकयो ऑलिम्पिकमध्येही ब्राझीलने सुवर्ण जिंकलं होतं. (Brazil Out of Olympics)

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत बाद फेरीचे सामने ब्राझील विरुद्ध अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला विरुद्ध पेराग्वे असे रंगले होते. आणि यात पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली, सामन्यातील एकमेव गोल लुसियानो गोंडोनं दुसऱ्या हाफमध्ये केला. (Brazil Out of Olympics)

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : इंग्लिश संघ तिसऱ्या कसोटीसाठी राजकोटमध्ये दाखल)

अर्जेंटिनाच्या संघाने (Argentina team) यापूर्वी २००४ आणि २००८ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलं होतं. अर्जेंटिनाचा हा नवीन संघ आहे. आणि त्यांनी जाणीवपूर्वक २३ वर्षांखालील खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी केली होती. यातून त्यांना आगामी फिफा विश्वचषकासाठीचा संघ घडवायचा आहे. हा संघ युवा असला तरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) मात्र ते ३६ वर्षीय लायनेल मेस्सी या त्यांच्या स्टार दिग्गज खेळाडूला खेळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ऑलिम्पिकसाठी मेस्सीला राजी करण्याचाच अर्जेंटिनाचा प्रयत्न असेल. दक्षिण अमेरिका खंडातून अर्जेंटिना व्यतिरिक्त पेराग्वे हा आणखी एक संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. (Brazil Out of Olympics)

(हेही वाचा – Marathon Champion Dies : मॅरेथॉनमधील विक्रमवीर केल्विन किपटमचा अपघाती मृत्यू)

पेराग्वेला हा सामना २ गोलच्या फरकानेच जिंकणं आवश्यक होतं. आणि नेमका तितका मोठा विजय मिळवून त्यांनी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. सामन्यातील ४८व्या मिनिटाला स्टार खेळाडू दिएगो गोमेझने पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. आणि कार्लोस सॅगिअरने सामना संपण्यापूर्वी १० मिनिटं आधी संघासाठी दुसरा मोलाचा गोल केला. व्हेनेझुएला विरुद्धच्या विजयामुळे पेराग्वेनं स्पर्धेत अर्जेंटिनाला मागे टाकत गुणांच्या आधारे अव्वल स्थान पटकावलं. पहिले दोन संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार होते. (Brazil Out of Olympics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.