BCCI in Action : अभिषेक नायरची गच्छंती नेमकी कशामुळे? संघातील दुफळी पुन्हा उघड?

नियुक्तीनंतर ८ दिवसांत अभिषेक नायरचं कंत्राट रद्द करण्यात आलंय.

93
BCCI in Action : अभिषेक नायरची गच्छंती नेमकी कशामुळे? संघातील दुफळी पुन्हा उघड?
BCCI in Action : अभिषेक नायरची गच्छंती नेमकी कशामुळे? संघातील दुफळी पुन्हा उघड?
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयने (BCCI) सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचं (Abhishek Nayar) कंत्राट रद्द केल्याची बातमी गुरुवारी सगळीकडे पसरली. पण, बीसीसीआयने अजून त्यावर कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, संघातील दुफळी, मुख्य प्रशिक्षक आणि स्टार खेळाडू यांच्यातील वाद अशा विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आणि त्यात अभिषेक नायरचा (Abhishek Nayar) बळी गेल्याचं बोललं जात आहे. भारतीय संघाच्या आतल्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याचीच चर्चा दबल्या आवाजात होतेय. दरम्यान, अभिषेक नायरला (Abhishek Nayar) बीसीसीआयकडून (BCCI) हा निर्णय कळवण्यात आल्याचंही समजतंय. (BCCI in Action)

अभिषेक नायरला (Abhishek Nayar) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या संघाच्या कामगिरीचं कारण देण्यात आलं आहे. पण, प्रत्यक्षात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचं बोललं जात आहे. ‘न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कामगिरीचे पडसाद या निर्णयांमध्ये उमटत आहेत, हे खरं आहे. पण, अभिषेक नायर (Abhishek Nayar) हा फक्त बळीचा बकरा आहे. पण, संघातील एक स्टार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील मधील महत्त्वाचा व्यक्ती यांच्यातील भांडणात अभिषेकचा बळी गेला आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. (BCCI in Action)

(हेही वाचा – ‘लिव्हिंग विल’ परत मिळविण्यासाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, Bombay High Court चे सरकारला आदेश)

अलीकडेच बीसीसीआयने प्रशिक्षकांनाही ३ वर्षांनंतर पदावर कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टी दिलीप (T Dilip) आणि सोहम देसाई (Soham Desai) यांची मुदतही संपेल. त्याचरोबर अभिषेक नायरलाही (Abhishek Nayar) जावं लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मालिका गमावल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधून अनेक बातम्या बाहेर फुटल्या होत्या. संघातील एका खेळाडूला अंतरिम कप्तान बनण्याची इच्छा आहे, गंभीर कुठल्या खेळाडूवर नाराज आहे, त्याने खेळाडूंशी काय चर्चा केली, या सगळ्याची मीडियात चर्चा झाली. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) नंतर त्यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. अप्रत्यक्षपणे त्यासाठी मुंबईकर खेळाडू सरफराज खानला (Sarfaraz Khan) जबाबदार धरलं होतं. त्यानंतर बीसीसीआय आता ॲक्शनमध्ये आली आहे. (BCCI in Action)

‘येत्या १-२ दिवसांत सगळं नक्की होईल. काही विषयांवर चर्चा सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर मीडियाला सर्व कळवलं जाईल,’ असं बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया (Devajit Saikia) यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. अभिषेक नायरची (Abhishek Nayar) गच्छंती मात्र अटळ दिसते आहे. अभिषेक नायर भारताकडून ३ एकदिवसीय सामने खेळला आहे. पण, प्रशिक्षक म्हणून तो खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचा दबदबा आहे. तो मुंबईकडून १०३ सामने खेळला आहे. (BCCI in Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.