Bajrang Punia : बजरंग पुनियावरील बंदी नाडाने तात्पुरती हटवली

Bajrang Punia : १० मार्चला लघवीचा नमुना द्यायला नकार दिल्यामुळे बजरंगवर बंदीची कारवाई करण्यात आली होती.

91
Bajrang Punia : बजरंग पुनियावरील बंदी नाडाने पुन्हा केली लागू
  • ऋजुता लुकतुके 

राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था अर्थात नाडाने (NADA) कुस्तीपटू बजरंग पुनियावर लादलेली बंदी तात्पुरती हटवली आहे. शिस्तपालन समितीने हा निर्णय घेताना आरोप निश्चिती होत नाही, तोपर्यंत बजरंग मुक्त असेल असा निर्वाळा दिला आहे. मार्च महिन्यात कुस्ती संघटनेनं घेतलेल्या ऑलिम्पिक निवड चाचणी स्पर्धेत बजरंग पुनियाने उत्तेजक चाचणीसाठी लघवीचे नमुने द्यायला नकार दिला होता. त्यानंतर नाडाने त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. (Bajrang Punia)

चौकशीनंतर नाडाने टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलेल्या बजरंगवर २३ एप्रिलपासून बंदी लागू केली. त्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेनेही बजरंगवर तोच बडगा उगारला. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी १० मार्चला सोनीपत इथं झाली होती. या स्पर्धेदरम्यान लधवीचे नमुने न देताच बजरंग तिथून निघून गेला होता. बंदीची कारवाई केल्यानंतर बजरंगने आपलं स्पष्टीकरणही दिलं होतं. (Bajrang Punia)

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: ‘या’ उमेदवारांचा विजय निश्चितच!)

‘आपण नमुना द्यायला नकार दिला नाही. उलट नाडाच्या अधिकाऱ्यांकडे मी काही गोष्टींवर दाद मागितली. ते जुनी झालेली आणि मुदत संपलेली किट्स वापरत होते. अशी किट्स ते का वापरतायत असा प्रश्न मी त्यांना विचारला,’ असं बजरंगचं यावर म्हणणं होतं. आणि बजरंगने तशी दादही नाडाकडे मागितली. (Bajrang Punia)

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नाडाच्या शिस्तपालक समितीने आपला निर्णय सोमवारी दिला आहे. ‘बजरंगवर दोषारोप अजून निश्चित झालेले नाहीत. नाडाने (NADA) आधी आरोप निश्चिती करावी आणि ते जी कलमं लावतात त्याला अनुसरून बजरंगचा जबाब नोंदवला गेला पाहिजे. त्यानंतरच बजरंगवर बंदीची कारवाई होऊ शकेल,’ असा निर्वाळा शिस्तपालन समितीने दिला आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल होईपर्यंत बजरंगवरील बंदी हटवली जाईल. (Bajrang Punia)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.