Lok Sabha Election Result 2024: रायगडमध्ये कुणाचे पारडे जड? तर काय सांगते आकडेवारी? 

108
Lok Sabha Election Result 2024: रायगडमध्ये कुणाचे पारडे जड? तर काय सांगते आकडेवारी? 

रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) मंगळवारी सकाळपासून मत मोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान २७ व्या फेरीत अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे ४ लाख ५१ हजार मतांनी आघाडीवर असून, उबाठा गटाचे उमेदवार आनंद गीते  (Anant Gite) हे ५१ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर नोटा या मतदानाची संख्या ही २३ हजार ९७५ इतकी आहे.  (Lok Sabha Election Result 2024) 

रायगड जिल्ह्यात एकूण मतदार किती?  

रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha Constituency) , २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत एकूण १६,६८,०६५ नोंदणीकृत मतदार होते, त्यापैकी ८,२०,४४० पुरुष, ८,४७,६२१ महिला आणि ४ तृतीय लिंगाचे होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १६,५२,९५२  नोंदणीकृत मतदार होते, त्यापैकी ८,२०,४४० पुरुष, ८,४२,२४६ महिला आणि ३ तृतीय लिंगाचे होते. २०१४ च्या निवडणुकीत, या मतदारसंघात एकूण १५,३२,७८१ नोंदणीकृत मतदार होते, त्यापैकी ७,५२,४९१ पुरुष, ७,८०,२९० महिला आणि ० तृतीय लिंगाचे होते. २००९  च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या १३,५९,८३० होती ज्यात ६,४३,२५७ पुरुष आणि ७,१६,५७३ महिला  होत्या.

(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: ‘या’ उमेदवारांचा विजय निश्चितच!)

स्पर्धकांची संख्या

२०२४ च्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २०१९ मध्ये या जागेसाठी स्पर्धकांची संख्या १६ होती, तर २०१४ मध्ये १० उमेदवार होते आणि २००९ च्या निवडणुकीत ही संख्या ७ होती.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.