Asian Games : भारताचा ७२ वर्षांचा दुष्काळ संपला; गोळाफेकीत कांस्य पदक

१९५१ नंतर आशियाई स्पर्धेत गोळा फेकीत पदक मिळवणारी किरण पहिली महिला ठरली. 

74

आशियाई स्पर्धा २०२३ (Asian Games) मध्ये भारताचा ७२ वर्षांचा दुष्काळ संपला आहे. भारताने गोळा फेक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. किरण बालियान हिने हा पराक्रम केला आहे. तिने १७.३६ मीटर लांब गोळा फेकून हे पदक मिळवले. १९५१ नंतर  खात्यात आशियाई स्पर्धेत गोळा फेकीत पदक मिळवणारी ही पहिली महिला ठरली.

किरणची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा

१९५१ मध्ये वेबस्टर यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते, त्या मुंबईतील होत्या. त्यांनी गोळाफेकत आशियाई स्पर्धेत  (Asian Games) पदक जिंकणारी किरण ही पहिला महिला ठरली. गोळाफेकीतील पदकाची भारताला ७२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २४ वर्षांच्या किरणची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. किरण ही रोज सकाळ आणि संध्याकाळी तिच्या आईसोबत स्टेडियममध्ये सराव करते. किरणसाठी तिची आईच प्रशिक्षक बनली होती. आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मैदानी स्पर्धाना आजपासून सुरुवात झाली आहे. त्यातच किरण हिने भारतासाठी पदकाचे खाते उघडले. किरणचे वडील सतीश बालियान हे हेड कॉन्स्टेबल आहेत.

(हेही वाचा Canada : कॅनडाला आणखी एक दणका; यंदा कॅनेडीयन सैन्यदल झाले सैरभैर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.